‘रात्रीस खेळ चाले’ मालिका बंद झाल्यामुळे शेवंता झाली ‘भावूक’ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : प्रेक्षकांची आवडती मालिका असलेल्या ‘रात्रीस खेळ चाले – 2’ या मालिकेने निरोप घेतला आहे. काल अखेरचा भाग प्रसारित झाला. या मालिकेमुळे सर्वाधिक चर्चेत राहिलेली अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर म्हणजे शेवंता हिने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट लिहिली आहे. मालिका संपल्यानंतर शेवंता भावनिक झाली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत.

View this post on Instagram

नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम मी आशा करते की आपण आपली आणि आपल्या जिवलगांची काळजी घेत आहात.. वेळ कठीण जरी असेल तरी आपण पुन्हा जोमाने उभे राहुया.. जसे की आपल्याला ठाऊक असेलच की आपली लाडकी मालिका म्हणजे रात्रीसखेळ चाले 2 ही आज आपला निरोप घेत आहे.. हे लक्षात येताच खूप आठवणी आज पुन्हा दाटून आल्या.. ह्या मालिके चा एक अविभाज्य भाग म्हणून.. मी झी मराठी चे मना पासून आभार मानते.. त्याच बरोबर मी मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते ह्यांचे सुद्धा खूप आभार मानू इच्छिते.. आणि आपण माय बाप प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभल्या बद्दल आपले मनापासून आभार.. मालिका समाप्ती ला आली हे समजायला कठीण तर जात आहेतच पण त्याच बरोबरच खूप साऱ्या आठवणींना पूर्णविराम मिळणार आहे पहिल्या भागाचे गुपित ह्या भागात उलगडणार आहे म्हटल्यावर शेवंता ह्या भूमिकेचे महत्त्व हे वेगळ्या प्रकारची जबाबदारी स्वीकारून मी पुन्हा टीव्ही वर यायचे ठरवले.. जबाबदारी म्हटली की दडपणाखाली असणे साहजिक होते.. पण त्यातून आपली ओळख पुन्हा निर्माण करायची एक सुवर्ण संधी ह्यातून मला दिसली.. आणि त्याला दिलेला प्रतिसाद त्याची पावती देऊन गेला.. पुढे आपली भूमिका किती महत्वाच्या टप्प्यावर जात आहे हे कळताच माझ्या बरोबर सगळेच मेहनतीने काम करू लागले.. माझ्या बरोबरच इतर सगळ्यांचा ह्या मालिकेला लाभलेला सहभाग खूप मोठा होता हा अनुभव खूप मोठी प्रेरणा देऊन गेला आहे आणि अजून काम करायची जिद्द देत राहतो.. कुठलही काम जेव्हा शेवटच्या टप्प्यात येत तेव्हा आपल्याला त्या बद्दल आपुलकी आणि अभिमान वाटतो.. आज तसेच काही वाटत आहे.. शेवंतांचे विविध रंगी पैलू साकारताना तिच्या व्यक्तीरेखा बद्दल फक्त आपण ऐकले होते,पण ही भूमिका रंगवताना त्या मध्ये माझ्या अभिनयाचे रंग चढत च गेले, आपल्या मालिकेतून आपलं मनोरंजन पुन्हा एकदा करण्याची संधी दिल्या बद्धल खूप आभार.. पुन्हा नव्याने आपल्या समोर मी लवकरच येईन ह्या बद्दल मी आशावादी आहे ! आपलं प्रेम आणि प्रतिसाद मिळत रहावा, ही विनंती एक कलाकार म्हणून आयुष्यभर रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करेन , बस तुमची साथ कायम राहावी हीच विनंती 🙏 माझा पॅकअप झाल्या नंतर काढलेला हा आशीर्वाद स्वरूप फोटो आणि आज मस्तिष्का वर पडलेले ही पुष्प पाकळी यांने माझे मन गहिवरून गेले. . . शब्द रचना – @omkar_nemlekar Thank you @sunilvasantbhosale @rajusawant_ @mvaccummm @naresh_vishnu @karajgar_uttara @joshiganesh23 @zeemarathiofficial . . Signing off as Shevanta ❤️ . #apurvanemlekar #shevanta #shevantalovers #ratriskhelchale2 #zeemarathi #goodbye

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on

नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम मी आशा करते की आपली आणि जिवलगांची काळजी घेत आहात.. वेळ कठीण जरी असेल तरी आपण पुन्हा जोमाने उभे राहुया.. जसे की आपल्याला ठाऊक असेलच की आपली लाडकी मालिका म्हणजे रात्रीस खेळ चाले 2 ही आज आपला निरोप घेत आहे.. हे लक्षात येताच खूप आठवणी आज पुन्हा दाटून आल्या.

ह्या मालिके चा एक अविभाज्य भाग म्हणून.. मी झी मराठी चे मना पासून आभार मानते.. त्याच बरोबर मी मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते ह्यांचे सुद्धा खूप आभार मानू इच्छिते.. आणि आपण माय बाप प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभल्या बद्दल आपले मनापासून आभार.. मालिका समाप्ती ला आली हे समजायला कठीण तर जात आहेतच पण त्याच बरोबरच खूप सार्‍या आठवणींना पूर्णविराम मिळणार असल्याचे तिने म्हटले आहे .