नवी दिल्ली : Raw Banana | पिकलेली केळी लोक अनेकदा खातात. पण, कच्च्या केळीचे सेवन करणारे फार कमी लोक आहेत. काहीजण कच्च्या केळ्याची भाजी, भरीत किंवा चिप्स खातात, पण त्याचा वापर इतर भाज्यांच्या तुलनेत कमी होतो. निरोगी राहण्यासाठी कच्च्या केळ्याचे नियमित सेवन करा. यामुळे अनेक आजार बरे होतात. कच्च्या केळ्यातील पोषक तत्व आणि त्याच्या सेवनाचे फायदे जाणून घेऊया (Raw Banana Health Benefits:).
कच्च्या केळ्यातील पोषकतत्व
कच्च्या केळ्यातील पोटॅशियम ब्लड प्रेशर लेव्हल नियंत्रित करते. तसेच डाएट्री फायबर, व्हिटॅमिन, फायटोन्यूट्रिएंट्स, मॅग्नेशियम, आयर्न, स्टार्च, फॉस्फरस, कॅल्शियम, झिंक, फोलेट, कॉपर, मँगनीज, कार्बोहायड्रेट इत्यादी कच्च्या केळ्यात असते. (Raw Banana)
कच्ची केळी खाण्याचे आरोग्यदायी फायदे
१. बीबॉडीवॉइज डॉट कॉम मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, कच्च्या केळ्याच्या सेवनाने ब्लड प्रेशर नियंत्रित राहते. हार्ट अटॅक, स्ट्रोक यांसारख्या समस्यांपासून बचाव होतो. हृदयाचे आरोग्य सुधारते.
२. कच्ची केळी डायबिटीज रुग्णांसाठी रामबाण औषध आहेत. यामुळे शुगर कंट्रोल होते. यामुळे इन्सुलिन हार्मोन हळूहळू रिलिज होते.
३. यातील व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी६, ई, के शरीरातील अनेक एंजाइमॅटिक प्रक्रियांमध्ये मदत करते आणि मेटाबॉलिज्म वाढवते.
४. कच्च्या केळ्यातील डाएट्री फायबर पोटाशी संबंधित समस्या जसे की ब्लोटिंग, अपचन, गॅस, पोटाचा अल्सर, बद्धकोष्ठता इत्यादी पासून बचाव करते. पचनक्रिया सुधारते.
५. यातील डाएट्री फायबरमुळे वजन वाढत नाही. पोट दीर्घकाळ भरलेले राहते.
अनहेल्दी खाणे टाळता येते. यामुळे वाढते वजन कमी करता येते.
डायरियाची समस्या असेल तर कच्ची केळी खाल्ल्याने या समस्येपासून सुटका मिळते.
तसेच, डोकेदुखी, मळमळ, थकवा, उलट्या, जुलाब ही लक्षणे कमी होतात. केस आणि त्वचेचे सौंदर्य वाढते.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Hair Loss | पुरुषांचे अकाली पडतेय टक्कल, हेयरफॉलची ‘ही’ 5 कारणं, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला,
केसगळतीला लागेल ब्रेक
Dirty Bedsheet | तुम्ही सुद्धा खुप दिवसांपासून बेडशीट धुतलेले नाही का? निष्काळजीपणा पडू शकतो महागात,
होऊ शकतात 5 मोठे आजार
Acne Pigmentation | मुरूम-फुटकुळ्या ताबडतोब होतील क्लीन बोल्ड, 5 सिम्पल फॉर्म्युले करा फॉलो,
गॅरंटीने होतील दूर