RBI च्या निर्णयामुळं तुमच्या ‘फिक्सड डिपॉजिट’वर होणार ‘परिणाम’, जाणून घ्या ‘नुकसान’ की ‘फायदा’ होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रिझर्व बँकने गुरुवारी आपल्या रेपो रेटमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. आरबीआयने आपला रेपो रेट 5.15 टक्के कायम ठेवला. समितीतील सर्व सदस्यांनी व्याजदर न बदलण्याच्या बाजूने मतदान केले. लागोपाठ दुसऱ्यांदा हा रेपो रेट स्थिर ठेवण्यात आला. तर रिवर्स रेपो रेट 4.90 टक्के कायम ठेवला. आरबीआयने सीआरआर 4 टक्के आणि एसएलआर 18.5 टक्के कायम ठेवला आहे.

आरबीआयने यापूर्वी 5 वेळा व्याजदरात कपात केली होती. आरबीआयद्वारे व्याजदरात बदल न केल्याचा परिणाम गुंतवणूकदारांच्या फिक्स्ड डिपॉजिट म्हणजेच एफडीवर होईल.

गुंतवणकदारांच्या एफडीवर परिणाम –
व्याजदर कायम ठेवल्याने बँकद्वारे एफडीच्या दरातील बदल अंतर्गत कारणाने होतील. ज्यात विविध बँकांचे फंड आवश्यकता सहभागी आहे. आरबीआयने मागीलवर्षी लागोपाठ 5 वेळा रेपो रेट मध्ये कपात केली होती. याचा परिणाम फिक्स्ड डिपॉजिटवर मिळणाऱ्या परताव्यावर झाला. डिसेंबर 2019 मध्ये आरबीआयने व्याजदरात बदल केला नाही. यानंतर एसबीआयने निश्चित काळासाठी एफडीवरील व्याज दर 15 बेसिस प्वाइंटने कमी केले होते.

10 जानेवारी 2020 पासून एसबीआयच्या एक वर्षांच्या एफडीवर व्याज दर 6.10 टक्के होते. तर नोव्हेंबर 2019 पासून व्याज दर 6.25 टक्के होते. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी एक वर्षाच्या एफडीवर व्याज दर 6.60 टक्के होते तर नोव्हेंबर 2019 ला व्याज दर 6.75 टक्के होते. यापूर्वी ऑगस्ट 2019 मध्ये सामान्य लोकांसाठी एफडी व्याज दर 6.8 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.3 टक्के होते.

ज्येष्ठ नागरिकांवर होणार परिणाम –
एफडीचे व्याज दर कमी झाल्याचा सर्वात जास्त परिणाम ज्येष्ठ नागरिकांवर होतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडी उत्तम पद्धत आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तम पर्याय आहे.

2019 – 20 मध्ये 5 टक्के राहण्याची शक्यता कायम –
रिझर्व बँकने आर्थिक वृद्धी दर 2019-20 मध्ये 5 टक्के ठेवण्याची शक्यता आहे. त्यांनी सांगितले की आर्थिक वृद्धी दर 2020-21 मध्ये सुधारुन 6 टक्के होती. त्यांचे म्हणणे आहे की आर्थिक वृद्धी दर अद्याप देखील आपल्या संभावित क्षमतेपेक्षा कमी आहे.