‘RBI चा मोदी सरकारला मोठा धक्का ! ‘विकासदर’ आणखी घटण्याचा वर्तवला ‘अंदाज’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरबीआयने देशाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता आपला रेपो रेट काही कमी केला नाही आणि मोदी सरकारला देखील धक्का दिला. चालू आर्थिक वर्षात देशाचा विकासदर 6.1 टक्के राहिलं असा अंदाज वर्तवला असताना आता त्यात 1.1 टक्क्यांनी कपात केली आहे. आरबीआयने चालू आर्थिक वर्षात विकासदर 5 टक्के राहिलं असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे आर्थिक मंदीचे सावट आणखी वाढण्याची शक्यता आहे.

एकाबाजूला विकासदर कमी राहिलं असा अंदाज व्यक्त केला असतानाच महागाई देखील वाढणार अशी शक्यता वर्तवली आहे. महागाई दर वाढून 3.5 टक्क्यांहून 3.7 टक्कांवर जाण्याचा अंदाज आहे. असा अंदाज होता की आरबीआय आर्थिक संकट मोदी सरकारला दिलासा देण्यासाठी रेपो रेटमध्ये कपात करेल परंतू असे काही झाले नाही.

आरबीआयने जवळपास सलग 5 वेळा आला रेपो रेट कमी केला होता परंतू आता तो जैसे थे ठेवून 5.15 टक्के इतकाच ठेवला. याआधी आरबीआयने 0.25 टक्क्यांनी कपात केली होती. तब्बल 5 वेळा मोदी सरकारला आरबीआयने दिलासा दिला. परंतू मागील तिमाहीत केवळ 4.5 टक्क्यांवर आला. मागील 6 वर्षातील जीडीपी निच्चांकीचा हा दर मानला जात आहे. रेपो रेट कमी झाला असता तर सरकारला थोडा दिलासा मिळाला असता परंतू आता सरकारला देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.