सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात झाला आश्चर्यकारक खुलास, आता समोर आली ‘ही’ गोष्ट, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन – सुशांतसिंह रजपूत आत्महत्येप्रकरणी दिसवेंदिवस नवीन माहिती बाहेर येत आहे. यातच मुंबई पोलिसांना तपासादरम्यान बरीच धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंतच्या पोलिसांच्या तपासात पोलिसांना सुशांतला ऑक्टोबर 2019 मध्ये नैराश्याने ग्रासले होते अशी माहिती मिळाली आहे. यामुळेच यादरम्यान तो मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये तो एक आठवडा ऍडमिट होता.

तसेच मागील काही वर्षांमध्ये सुशांतने पाच मानसोपचारतज्ज्ञांनाही भेटला होता. मुंबई पोलिसांनी यातील दोन डॉक्टरांची शुक्रवारी कसून चौकशी केली आहे. यातील एका डॉक्टरने आपण सुशांतवर एका वर्षांपासून उपचार करत असल्याचे सांगितले आहे. सुशांतने त्याची मैत्रिण रिया चक्रवर्तीच्या एका मित्राच्या सांगण्यानुसार मानसोपचारतज्ञाला भेटवले होते. त्यावेळी सुशांत प्रचंड नैराश्यात होता. झोप न लागणे, सारखा कसलातरी विचार करणे, सगळ्यांकडे संशयाने पाहणे अशी लक्षणे सुशांतमध्ये दिसत होती.

सुशांत उपचाराला येताना त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती नेहमी त्याच्यासोबत असायची, ही देखील महत्वाची माहिती मिळाली आहे. सुशांतच्या मानसिक उपचार दरम्यानच्या सगळ्या नोट्स, फाइल्स आणि इतर सगळी माहिती जप्त केली आहेत. डॉक्टरांनी जी माहिती पोलिसांना दिली आहे, त्यातील बरीच माहिती पोलिसांनी मीडियासमोर उघड केली नाही. आता पोलिस मिळालेल्या या माहितीची दुसरे डॉक्टर आणि सुशांतच्या कुटुंबियांकडून शहानिशा करणार आहेत.