Jio चे 3 जीबी डेटाचे प्लान, 84 दिवसांच्या वैधतेसह ‘हे’ फायदे, जाणून घ्या किंमत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतातील सर्वांत मोठी टेलिकॉम कंपनी (Telecom Company) रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपल्या ग्राहकांसाठी नवीन प्लॅन (Plans) आणले आहेत. काही प्लॅनमध्ये (Plans) ग्राहकांना (Customer) दिवसाला १.५ जीबी डेटा (Data) दिला जात आहे, तर काही प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा दिला जातो. आज आम्ही तुम्हाला रोज ३ जीबी डेटा मिळणाऱ्या प्लानसंबंधी खास माहिती देणार आहोत. या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा मिळत असून, या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. ३४९ रुपयांपासून या प्लॅनची सुरुवात होत असून, मागणीनुसार यामध्ये वाढ होत जाते.

३४९ रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये तुम्हाला रोज ३ जीबी डेटा मिळणार असून, याची वैधता २८ दिवसांची आहे. २८ दिवसांमध्ये एकूण ८४ जीबी डेटा मिळतो. कॉलिंगसाठी जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड तर अन्य नेटवर्कसाठी १ हजार नॉन जिओ मिनिट्स मिळतात. यामध्ये रोज १०० एसएमएस आणि जिओ अपचे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे.

४०१ रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये तुम्हाला रोज ३ जीबी डेटा मिळणार असून, याची वैधता २८ दिवसांची आहे. २८ दिवसांमध्ये एकूण ९० जीबी डेटा मिळतो. कॉलिंगसाठी जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड, तर अन्य नेटवर्कसाठी १ हजार नॉन जिओ मिनिट्स मिळतात. यामध्ये रोज १०० एसएमएस आणि जिओ अपचे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे. यात १ वर्षासाठी डिज्नी प्लस हॉ़टस्टारचे सब्सक्रिप्शन मोफत मिळणार आहे.

९९९ रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये तुम्हाला रोज ३ जीबी डेटा मिळणार असून, याची वैधता ८४ दिवसांची आहे. ८४ दिवसांमध्ये एकूण २५२ जीबी डेटा मिळतो. कॉलिंगसाठी जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड तर अन्य नेटवर्कसाठी ३ हजार नॉन जिओ मिनिट्स मिळतात. यामध्ये रोज १०० एसएमएस आणि जिओ अपचे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे.

You might also like