Jio ची भन्नाट ऑफर ! 249 रुपयांमध्ये 56GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिलायन्स जीओकडे २८ दिवसांची वैधता असणारे अनेक रिचार्ज प्लॅन आहेत. तसेच दररोज २ जीबी डेटा देणारे ऑफर्स देखील आहेत. मात्र, आज आम्ही तुम्हाला रिलायन्स जिओच्या एका प्लॅनबाबत सांगणार आहोत.

जीओचा २४९ रुपये किमतीचा एक प्लॅन आहे. त्याची वैधता २८ दिवसांची आहे. तसेच या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा कंपनीकडून दिला जातो. म्हणजेच २८ दिवसात एकूण ५६ जीबी डेटा वापरकर्त्यांना मिळतो. जिओच्या या प्लॅनमध्ये डेटाशिवाय कॉलिंगची सुविधा दिली जाते. जिओ ते जिओ ग्राहक अनलिमिटेड कॉलिंगची मजा घेऊ शकतात. तर इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी ग्राहकांना १ हजार नॉन जिओ मिनिट मिळतात.

२४९ रुपयांच्या या रिचार्ज पॅकमध्ये ग्राहकांना रोज १०० एसएमएस फ्री मिळतात. तसेच जिओ ऍप चे सब्सक्रिप्शन सुद्धा ऑफर केला जावू शकतो. तसेच, त्याशिवाय, जीओकडे ४४४ रुपये, ५९९ रुपये, २३९९ रुपये, २५९९ रुपयांचे रिचार्ज पॅकमध्ये देखील २ जीबी डेटा ऑफर केला जातो. हे सर्व रिचार्ज पॅक सुद्धा अनलिमिटेड कॉलिंग ऑफर सोबत मिळतात.