चिंतामणी मंदिरात चिंचवड देवस्थान ट्रस्ट कडून श्रीमंत माधवराव पेशवेंच्या स्मारकाचे नुतनीकरण

लोणी काळभोर : पोलीसनामा (शरद पुजारी) – थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिरात श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या स्मारकाचे नुतनीकरण चिंचवड देवस्थान ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले. येथे माधवराव पेशवे यांचा सुबक पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला आहे.

थेऊर येथील चिंतामणी गणपती हे श्रीमंत माधवराव पेशवे यांचे आराध्य दैवत त्यामुळे त्यांना राजयक्ष्मा या आजाराने त्रास होत असताना त्यांनी शेवटच्या काळात आपल्या आराध्यासमोर घालविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे श्रीमंतांनी हैदरअली विरुध्दची मोहीम अर्धवट सोडून थेऊर येथे पोहोचले. संपूर्ण मराठे साम्राज्याची सूत्रे थेऊर येथून चालवली व त्याचे चिंतामणी मंदिरात देहावसान झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नी रमाबाई पेशवे येथे सती गेल्या.

याच चिंतामणी मंदिरात त्यांचे स्मारक आहे. येथे अगोदर त्याचे तैलचित्र होते. मध्यंतरी येथील शिल्पे खराब झाल्याने या संपूर्ण ओवरीचे सुशोभिकरण करण्यात आले. चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या संकल्पनेतून येथे माधवराव पेशवे यांचा एक सुंदर पूर्णाकृती पुतळा तयार करण्यात आला तसेच दोन्ही बाजूस त्यांच्या दरबारातील देखावा शिल्परुपात साकारला आहे हे संपुर्ण काम वास्तुतज्ञ सुबोध दिक्षीत यांनी मोठ्या खुबीने केले आहे. या दिक्षीत यांनी मेहनताना न घेता केवळ लागलेल्या साहित्याचा खर्च घेऊन काम पूर्ण केले. यासाठी त्यांना ओवरीतील भित्तीचित्राच्या नुतनीकरणासाठी विश्वास परळीकर यांनी तर माधवरावांच्या पूर्णाकृती पुतळा बनविण्यासाठी अभिजीत धोंडफळे यांनी योगदान दिले. तसेच ऐतिहासिकपणा जीवंत रहावा यासाठी बाहेरील बाजूस बेसाल्ट दगडाचा वापर करण्यात आला.

या स्मारकाचे उद्घाटन थेऊर च्या सरपंच संगीता तारु व चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव यांनी केले यावेळी उपसरपंच विलास कुंजीर, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विश्राम देव, आनंद तांबे, अँड राजेंद्र उमाप, विनोद पवार,माजी उपसरपंच आप्पासाहेब काळे, व्यवस्थापक मंगलमूर्ती पोफळे, संजय कुंजीर, संजय गावडे, महेश आगलावे, चेतन आगलावे आदी मान्यवर उपस्थित होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like