‘हुरहुन्नरी’ पत्रकार रामचंद्र चौधरी काळाच्या पडद्याआड

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – पूर्व हवेलीतील एक नामांकित हुरहुन्नरी पत्रकार अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने पत्रकारीतेच्या क्षेत्राला चटका लावणारी घटना घडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. उरुळी कांचन येथील पत्रकार रामचंद्र मुरलीधर चौधरी (वय 45 वर्षे) यांचे काल बुधवारी सायंकाळी आकस्मिक निधन झाले. ही बातमी हवेलीतील पत्रकार क्षेत्रात वाऱ्यासारखी पसरली आणि सर्वच स्तब्ध झाले.

रामचंद्र चौधरी हे गेली दहा ते बारा वर्षापासून एका नामांकित वर्तमानपत्रात काम करत होते. तसेच ते एका मतिमंद विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. अत्यंत मनमिळाऊ व प्रत्येक सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेत असत. यात ग्रामस्वच्छता अभियान असो अथवा कोणाला वैयक्तिक सहकार्य असो ते स्वतः काम करवून घेत.

त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी, आई वडील व भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या पत्नी सोरतापवाडी गावच्या उपसरपंच आहेत. मुलगा व मुलगी उच्च शिक्षित आहेत. आज सकाळी नऊ वाजता त्यांच्या मूळ गावी सोरतापवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील राजकीय, सामाजिक, पत्रकारिता क्षेत्रातील पदाधिकारी व नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे म्हणाले की, आपला एक सच्चा दिलदार साथी हरवला आहे. ही पोकळी कधीच भरुन निघणार नाही. एक तरुण सहकाऱ्याचे अचानक जाणे मनाला चटका लाऊन जाणारे ठरले.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like