वैज्ञानिकांनी शोधली ‘कोरोना’ व्हायरसविरूध्द लढू शकणारी सक्षम अ‍ॅन्टीबॉडी, संशोधनातील दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरातील शास्त्रज्ञ कोरोना विषाणूवर उपचार शोधण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. कोविड 19 ची लस आणि औषध विकसित करण्याचे काम अनेक देशांचे शास्त्रज्ञ करीत आहेत. कोरोना विषाणूबद्दल दररोज नवीन संशोधन देखील समोर येत आहे. दरम्यान, अमेरिकेच्या ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी लॅब टेस्टिंग प्रक्रिया विकसित केली आहे. हे आपल्या पेशींमध्ये होणार्‍या कोरोना विषाणूच्या संक्रमणापासून संरक्षण करणारे ॲण्टीबॉडीज ओळखण्यासाठी मदत करते. या शोधासह, कोरोना विषाणूच्या उपचारांच्या मार्गावर एक आशा निर्माण झाली आहे.

शास्त्रज्ञांच्या मते, कोरोना विषाणूपासून बरे झालेल्या रुग्णाच्या शरीरात ॲण्टीबॉडीज विकसित होण्याची शक्यता आहे. परंतु त्यांच्या शरीरात रोग प्रतिकारशक्ती किती विकसित झाली हे अद्याप माहित पडले नाही. काही ॲण्टीबॉडीज शरीराचे रक्षण करतात तर काही ॲण्टीबॉडीज शरीराला हानी पोहोचवतात. ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीचे वैज्ञानिक डॉ. शान लू लियू यांच्या म्हणण्यानुसार, सध्या अनेक प्रकारची तपासणी उपलब्ध आहे जी ॲण्टीबॉडीज ओळखण्यास मदत करतात. परंतु ते ॲण्टीबॉडीज निष्क्रिय करू शकतात की नाही हे आम्हाला सांगता येत नाही. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात किती प्रतिपिंडे असतात हे आम्हाला त्यांच्याद्वारेच माहित पडते.

या संशोधनाचे वरिष्ठ संशोधक डॉ लियू आहे. हे संशोधन जेसीआय इनसाइट जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, या चाचणीमुळे ॲण्टीबॉडीजमध्ये संरक्षणात्मक क्षमता आहे की नाही हे जाणून घेण्यास मदत होते. अशा परिस्थितीत हे एखाद्या रूग्णाला पुन्हा संसर्गापासून वाचवू शकते. या संशोधनात पुरावा सापडला आहे की, आयसीयूमध्ये दाखल झालेल्या सर्व रूग्णांनी शरीरातील खराब प्रतिपिंडे काढून टाकण्याची क्षमता विकसित केली आहे. त्याच वेळी, प्लाझ्मा डोनर आणि आरोग्य कामगारांमध्ये निम्न स्तरावरील प्रतिपिंडे आढळले आहे.

यामुळे हे माहित पडते की, रोग जितका गंभीर असेल तितकेच शरीरात ॲण्टीबॉडीज तयार होतील. या प्रकरणात, त्याच्या शरीरात संसर्ग झाल्यानंतर विविध ॲण्टीबॉडीज बनवण्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात असेल. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, या चाचणीचा उपयोग ज्या लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे त्यांना ॲण्टीबॉडीज देण्यासाठी दिला जाऊ शकतो.