Revive Lapsed LIC Policy | एलआयसी पॉलिसी धारकांसाठी मोठी खुशखबर ! सुरू करण्यात आले हजारो लोकांच्या फायद्याची मोहिम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Revive Lapsed LIC Policy | सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) ने लॅप्स झालेल्या वैयक्तिक विमा पॉलिसी पुन्हा सक्रिय करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. एलआयसीने शनिवारी एका पत्रकात म्हटले की, प्रीमियम भरण्याच्या कालावधीत ज्या पॉलिसी लॅप्स झाल्या आहेत आणि ज्यांची मॅच्युरिटी पूर्ण झालेली नाही अशा पॉलिसी या मोहिमेअंतर्गत पुन्हा चालू केल्या जाऊ शकतात. ही मोहीम 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 25 मार्च 2022 पर्यंत चालणार आहे.

 

विमा कंपनीने म्हटले आहे की, COVID-19 महामारीने विमा संरक्षणाच्या गरजेवर भर दिला आहे आणि ही मोहीम एलआयसी पॉलिसीधारकांसाठी त्यांच्या पॉलिसी पुन्हा सक्रिय करण्याची एक चांगली संधी आहे. एलआयसीने म्हटले आहे की लॅप्स पॉलिसी पुन्हा सक्रिय करण्यावरील शुल्क देखील माफ केले जात आहे. मात्र, ही सूट मुदत योजना आणि उच्च जोखीम विमा योजनांवर उपलब्ध होणार नाही.

 

पॉलिसी पुन्हा सक्रिय करण्यासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय अहवालात कोणताही दिलासा दिला जाणार नाही. परंतु आरोग्य आणि सूक्ष्म विमा योजनांमध्ये, विलंबाने प्रीमियम भरण्याचे शुल्क माफ केले जाईल. या मोहिमेअंतर्गत पाच वर्षांपासून प्रीमियम न भरलेली पॉलिसी सक्रिय केली जाऊ शकते.

 

Web Title :- Revive Lapsed LIC Policy | lic gave a chance to revive the lapsed policy

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा