‘शास्त्रानुसार ‘हे’ केल्यास निवडणुकीत विजय निश्चित’, ज्योतिषी आर. एच. सोनी यांचा दावा (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील सुप्रसिद्ध जोतिषी आर. एच. सोनी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शास्त्रानुसार काही दावे केले आहेत. आर. एच. सोनी आपल्या ज्योतीष शास्त्रासाठी ओळखले जातात. गेल्या 25 वर्षांपासून आपल्या ज्योतीष शास्त्राच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकांच्या अडचणी दूर केल्यात. आर एच सोनी यांनी केलेली वक्तव्ये ही तंतोतंत खरी होतात असा त्यांचा दावा आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता त्यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्ये केली आहेत. शास्त्रानुसार राहुशिवाय राजकारण होऊ शकत नाही असे म्हणत त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी नेमकं काय करावं लागतं हे सांगितलंय. शास्त्रानुसार निवडणूक जिंकण्यासाठी अर्ज भरताना तो कोणत्या वेळी भरावा तसेच तुमचं तोंड कोणत्या दिशेला असावं, कार्यालयात लावलेला पक्षाचा झेंडा कोणत्या दिशेला असावा तसेच आपल्या विरोधकांवर आपला प्रभाव पाडण्यासाठी काय करायला हवं या गोष्टींना घेऊन अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. आर एच सोनी यांनी आपल्या वक्तव्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.

आर एच सोनी म्हणतात, “निवडणूक जिंकण्यासाठी 3 प्रकारच्या बळाची आवश्यकता असते. यात पहिलं आहे शारीरिक बळ. यात हे महत्त्वाचं आहे की, तुमच्यासोबत किती माणसं आहेत. ही माणसे फक्त शरीराने तुमच्यासोबत नसावी तर मनाने असावीत. यात दुसरं बळ म्हणजे धन. याला भौतिक बळंही म्हटलं जातं. यानंतर येतं ते म्हणजे दैवी बळ. यात तुमची जन्मकुंडली महत्त्वाची असते. यात तुमचं भाग्य तुम्हाला साथ देत आहे किंवा नाही हे महत्त्वाचं आहे.”

पुढे सोनी म्हणतात, “राहूशिवाय राजकारण होऊ शकत नाही. राहू राजकारणाचा देवता मानला जातो. अखेरपर्यंत तो सत्ता कधी बदलेल हे सांगता येत नाही. तु्म्हाला सत्तेत राहून राज्य करण्यासाठी त्यातही दैवी बळातील ज्या गोष्टींची मदत घ्यावी लागते त्यात यंत्र, मंत्र, रत्न, रुद्राक्ष, होम, हवन, दान, दक्षिणा, पूजापाठ, हे सगळं येतं. गुरुचा आशीर्वाद येतो. या सर्वाधिक महत्त्वाचं काही असेल तर ते म्हणजे तंत्र. निवडणूक जिंकण्यास उत्सुक व्यक्तीने जर वेदांमधील दुर्लभ साधना महासंग्राम विजयी साधनेची मदत घेतली तर त्याचा विजय निश्चित आहे.”

Visit : policenama.com