Video : रिंकू राजगुरूनं थेट गाठलं लंडन ! शेअर केला ‘हा’ व्हिडीओ

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सैराट चित्रपटातून लोकांसमोर आलेली आणि लोकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू आज मराठीतील टॉप अ‍ॅक्ट्रेसेपैकी एक आहे. सैराटनंतर रिंकुनं अनेक सिनेमात आणि वेब सीरिजमध्येही काम केलं. परंतु सैराटमध्ये शरीरानं टंच दिसणारी आर्ची आता अचानक स्लिम ट्रीम झाली आहे. रिंकूनं तिचं वजन घटवल्याचं काही दिवसांपूर्वीच समोर आलं आहे. सध्या रिंकू लंडनला गेली आहे. तिथूनं एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे जो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

रिंकूनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिनं लोकेशनमध्ये लंडन लिहिलं आहे. या व्हिडीओत रिेकू खूपच स्टायलिश दिसत आहे. तिच्या पराठीवर बॅगही आहे. कोट घातलेली रिंकू खूपच सुंदर दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CGRSc8TJhIx/

रिंकू लंडनला शुटींगसाठी गेली आहे की, फिरण्यासाठी गेली आहे हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. सध्या तिचे चाहते तिच्या आगामी प्रोजेक्टची वाट पहात आहेत.

रिंकूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच ती हंड्रेड वेब सीरिजमध्ये दिसली आहे. लवकरच ती झुंड या हिंदी सिनेमात काम करताना दिसणार आहे. या सिनेमात ती बिग बी अमिताभ बच्चनसोबत काम करणार आहे. तिच्या लुकचं पोस्टरही रिलीज झालं आहे. तिनं मेकअप, कागर अशा अनेक सिनेमात काम केलं आहे.

https://www.instagram.com/p/CFY35SXpGdG/

https://www.instagram.com/p/CEI5tV_p0q9/

https://www.instagram.com/p/CD-ZvCWpa6M/

https://www.instagram.com/p/CDaVqQipYTG/

https://www.instagram.com/p/CDFtCnIJp3O/

https://www.instagram.com/p/CC2X7lxJKyM/