समुद्रात वाढली जेलीफिश ! मासेमारी धोक्यात ? मच्छीमारांवर मत्सदुष्काळाचे संकट

पोलीसनामा ऑनलाईन – राज्याच्या सागरी किनारपट्टीवरील भागातील दिवसेंदिवस वाढत्या जेलीफिशची (jellyfish) संख्या ही मच्छीमारांसाठी डोकेदुखी(Headaches for fishermen) ठरली आहे. जेलीफिशच्या वाढत्या अतिक्रमणाचा थेट परिणाम मासेमारी व्यवसायावर होत आहे. मच्छीमारांच्या जाळ्यात माशाऐवजी जेलीफिशच मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यामुळे राज्यातील मच्छीमारावर मत्सदुष्काळाचे संकट ओढवले आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या सागरीपट्ट्यात जेलीफिश मोठ्या संख्येने दिसत असल्याचे मच्छीमार सांगत आहेत. मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग-रत्नागिरी आदी सागरी क्षेत्रात किनारपट्टीनजीक जेलीफिशची संख्या वाढली आहे. किनारपट्टीनजीक केशरी, जांभळ्या रंगाच्या जेलीफिश दिसत आहेत. त्यांच्या आसपास मोठे मासे येत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून मासेमारी कमी झाल्याचे मासेमारी व्यावसायिक सांगत आहेत. याचा फटका प्रामुख्याने ट्राॅलर, गील नेट आणि पर्ससीन जाळीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना बसला आहे. याबाबत ऑल इंडिया पर्ससीन वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष गणेश नाखवा म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून सागरी पाण्यात मोठ्या संख्येने जेलीफिशची संख्या वाढल्याने मच्छीमारांच्या जाळ्यात माशांऐवजी जेलीफिशचे थवे येत आहेत.

जेलीफिश हे लहान माशांच्या अंडी आणि माशांच्या पिल्लांना खातात. त्यामुळे त्या सागरी भागातील माशांच्या साठ्यावर आणि त्यांच्या वाढीवर परिणाम होतो. तसेच लहान माशांना खाणारे करणारे आणि व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेले मोठे मासे देखील अन्नाच्या अभावामुळे त्या भागातून स्थलांतर करतात. सध्या खोल समुद्रात आढळत असलेले जांभळ्या रंगाचे जेलीफिश हे काऊनड्’ जेलीफिश असून किनारपट्टीलगत सापडणारी केशरी रंगाची जेलीफिश सेफिय’ किंवा क्रायोसोरा जातीमधील आहे.
स्वप्नील तांडेल, सागरी जीवशास्त्रज्ञ