RMD Foundation | रुग्णवाहिका हि रुग्ण आणि रुग्णालय मधील महत्वाचा दुवा – शोभाताई धारीवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – RMD Foundation | आपत्कालीन परिस्थितीमध्ये जर वेळेवर उपचार मिळाला तर रुग्णाचे प्राण वाचू शकतात. अशा परिस्थितीत रुग्णास वेळेवर रुग्णवाहिकेची मदत मिळाली तर ती रुग्ण आणि रुग्णालयामधील जीवरक्षक दुवा असते, असे मत आरएमडी फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई रसिकलाल धारीवाल (Shobha Rasiklal Dhariwal) यांनी व्यक्त केले. आरएमडी फाऊंडेशनच्या निधीतून श्री अष्टविनायक मित्रमंडळ विश्रांतवाडी (Vishrantwadi) या गणपती मंडळास रुग्णवाहिका देण्यात आली. त्यावेळी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याच्या वेळी त्या बोलत होत्या. (RMD Foundation)

आरएमडी फाऊंडेशनच्या माध्यमातून गरजू व हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, पर्यावरण व आरोग्य सेवेबाबत मागील २० वर्षांपासून कार्यरत असल्याचे तसेच शाकाहार हा ऊत्तम आहार याबाबत मी नेहमीच विविध कार्यक्रमातून प्रसार व प्रचार करते, शाकाहारी होण्याची लाज नसावी तर अभिमान असावा असे जाहीर आवाहनही यावेळी त्यांनी उपस्थितांना केले. (RMD Foundation)

रसिकशेठ धारीवाल यांच्या देणगीने संपूर्ण देशभर अनेक समाजोपयोगी प्रकल्प राबविण्यात आले. तीच प्रथा यापुढे शोभाताई चालवित आहे असे मत बापू पठारे यांनी व्यक्त केले. रुग्णवाहिकेमुळे विश्रांतवाडी, येरवडा व आजूबाजूच्या परिसरातील गरजू रुग्णास नक्कीच मदत मिळेल अशी भावना यावेळी ॲड. भगवान जाधव यांनी व्यक्त केली. श्री अष्टविनायक मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णवाहिकेची प्रतिकृती, शाल व श्रीफळ देऊन शोभाताई धारीवाल यांचा सत्कार केला.

यावेळी व्यासपीठावर शिरीष मोहिते, अनिल टिंगरे, मंगला मंत्री,
अर्जुन भैय्या जगताप, विशाल टिंगरे, डॉ रसिक शेटीया, दिलीप पवार, कर्नल तृप्ती देशपांडे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर, सुहास बोरा, ॲड. संकेत बोरा, दिलीप पाटील, अष्टविनायक मित्र मंडळाचे राहुल जाधव, अभिजीत कदम व पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime News | यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्याच्या बदल्यात आधी दिले पैसे, नंतर साडेपाच लाखांना घातला गंडा; कोंढवा परिसरातील प्रकार

लग्न करण्यास नकार दिल्याने विवाहितेचा विनयभंग, नानापेठ येथील घटना

चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीवर चाकूने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न, पतीला अटक

बनावट कागदपत्रांद्वारे मिळकत हडपण्याचा प्रयत्न, शिवाजीनगर परिसरातील घटना

दीडपट परतावा देण्याच्या बहाण्याने 48 लाखांची फसवणूक, हिंजवडी परिसरातील प्रकार

रिक्षाचालकावर धारदार हत्याराने हल्ला, दोघांवर FIR; मांजरी येथील घटना

फ्लॅटचा ताबा न देता 30 लाखांची फसवणूक, मार्केट यार्डमधील घटना

बहिणीला कामावरुन कमी केल्याच्या रागातून टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण, कोंढवा परिसरातील घटना

Maximizing Your Money: How Auto Sweep Facility Turns Savings Into Wealth

Pune Pimpri Crime News | आमची जमीन रस्त्यात गेली, महिलेने भाजी विक्रेत्याकडून उकळली खंडणी; हिंजवडी परिसरातील प्रकार