रोहिणी खडसेंना ‘कोरोना’ची बाधा, ‘त्या’ कार्यकर्त्यांना केलं आवाहन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची बाधा (rohini-khadse-infected-corona-appealed-those-activists) झाली आहे. यासंदर्भात स्वत: रोहिणी यांनी ट्विटवरुन माहिती दिली. त्यांच्यावर जळगावमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आपल्या ट्विटमध्ये रोहिणी खडसेने म्हटले आहे की, माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह (Corona Positive) आली आहे. प्रकृती उत्तम आहे. मात्र, खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल होत आहे. गेल्या सहा दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी करोना चाचणी करून घ्यावी व स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. रोहिणी खडसे विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर त्या निवडणूक रिंगणात होत्या. मात्र, शिवसेनेच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला.

गेल्या 4 ते 5 वर्षांपासून भाजपात नाराज असल्याने अखेर एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी, त्यांच्यासमवेत रोहिणी खडसेंनीही भाजपाला रामराम करत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेतले आहे. जळगाव जिल्ह्यात खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे मोठा राजकीय भूकंप झाला आहे.