Rohit Pawar On Raj Thackeray | ‘अंगावर शॉल टाकली म्हणजे कोणी बाळासाहेब होत नाही’; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर निशाणा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Rohit Pawar On Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतलेल्या दोन सभांमध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली होती. शरद पवार हे स्वत: कोणत्याही धर्माला मानत नाहीत. मग ते त्यांच्या पद्धतीने राजकारण करतात, त्यांच्या पक्षामुळेच महाराष्ट्रात जातीय राजकारण फोफावतं असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. (Rohit Pawar On Raj Thackeray)

 

राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या भाषणाची कॉपी (Copy) करत नाही. मात्र अंगावर शॉल टाकली म्हणजे कोणी बाळासाहेब होत नाही. राज ठाकरे हे एक अभिनेते (Actor) असून ते चांगला अभिनय करत आहेत. राज ठाकरे यांचं भाषण मला आवडायचं मात्र ते आता भाजप (BJP) सांगेल तसं करत असल्याचं म्हणत रोहित पवार यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. (Rohit Pawar On Raj Thackeray)

 

राज ठाकरे यांच्या भाषणाची स्क्रीप्ट ही भाजपची आहे. विकासाच्या मुद्द्यावर आता कोण बोलत नाही मात्र आपण आता विकासाच्या मुद्द्यांना पुढे घेऊन जाणार असल्याचं रोहित पवार म्हणाले. मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये (MNS-NCP) भोंग्यांवरून वाद पेटला आहे.

दरम्यान, राज ठाकरे दोन दिवसीय पुणे (Pune) दौऱ्यावर आहेत.
या दौऱ्यात हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादीकडून उद्या इफ्तार पार्टीचे (Iftar party) आयोजन करण्यात आले आहे.
पुण्यात राजकीय घमासान पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Pune Crime | murder of youth in bharti vidyapeeth police station area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा