जगातील सर्वोत्तम संघाचे ‘कर्णधारपद’ MS धोनीकडे, ‘या’ 11 खेळाडूंना टीमध्ये स्थान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने एकदिवसीय क्रिकेटमधील या दशकातील सर्वोत्तम संघाची घोषणा केली. या संघामध्ये भारताच्या तीन खेळाडूंना स्थान देण्यात आले असून विशेष म्हणजे कसोटी संघाप्रमाणे वनडे संघाचे कर्णधारपद भारतीय खेळाडूकडे देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने या संघाची घोषणा सोमवारी (दि.23) केली आहे.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने सोमवारी घोषीत केलेल्या संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे देण्यात आले आहे. कसोटी संघात विराट वगळता अन्य भारतीय खेळाडूंचा समावेश केला नव्हता. कसोटी संघाप्रमाणेच वनडे संघाची देखील यावेळी निवड करण्यात आली. या संघात माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी, विद्यमान कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मा या तीन भारतीय खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. रोहित शर्माला सलामीवीर म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. तर विराटवर तिसऱ्या क्रमांकाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर कर्णधारपद धोनीकडे देण्यात आले आहे.

दशकातील सर्वोत्तम संघात तीन भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, या संघामध्ये एकाही पाकिस्तानी खेळाडूचा समावेश करण्यात आलेला नाही. अफागाणिस्तानचा गोलंदाज रशिद खान आणि बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन या दोघांना संघात स्थान देण्यात आले आहे. आफ्रिकेच्या संघातील एबी डिव्हिलियर्स आणि हशिम अमला यांना तर ऑस्ट्रेलियाच्या फक्त मिशेल स्टार्कच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाचा संघ
महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, हाशिम अमला, एबी डिव्हिलियर्स, शाकिब अल हसन, जोश बटलर, रशिद खान, मिशेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट, लसित मलिंगा

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/