नोकरी विषयक

10 वी पास उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरीची ‘सुवर्ण’संधी ! 2000 जागांसाठी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वेमध्ये नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे भर्ती सेल (आरआरसी) जयपूरने ट्रेड अ‍ॅप्रेंटिसच्या विविध पदांसाठी लवकरच भरती सुरु करणार आहे. या पदांसाठी आयटीआय धारक उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया 8 नोव्हेंबर 2019 पासून सुरू होणार आहे.

संस्थेचे नाव – रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC)
पदाचे नाव – ट्रेड अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता – दहावी पास आणि संबंधित विषयामध्ये आयटीआय डिप्लोमा केलेला हवा.
अर्जाचा शुल्क – ओपन आणि ओबीसी वर्गाच्या अर्ज धारकांसाठी 100 रुपये शुल्क द्यावा लागणार आहे.
वयाची मर्यादा – अर्ज धारकाचे वय कमीतकमी पंधरा वर्ष आणि जास्तीत जास्त चोवीस वर्ष असणे गरजेचे आहे. तर आरक्षण असलेल्या वर्गातील अर्जधारकाला जास्तीत जास्त वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आलेली आहे.

महत्वाच्या तारखा
अर्ज भरण्याची तारीख – 8 नोव्हेंबर 2019
शेवटची तारीख – 8 नोव्हेंबर 2019

कसा भरायचा नेमका अर्ज
या जागेच्या पदासाठी http://www.rrcjaipur.in/ या अधिकृत वेब साईटवर जाऊन माहिती तपासा.

Visit : Policenama.com

Back to top button