‘आरएसपी’चे विद्यार्थी हे वाहतुकीचे “ब्रॅंड अँबेसिडर’

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – “आरएसपी’चे विद्यार्थी हे वाहतुकीचे “ब्रॅंड अँबेसिडर’आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी केले. सांगली पोलिस दल आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या 31 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या समारोपप्रसंगी प्रमुख ते बोलत होते.

प्रारंभी आरएसपीच्या विद्यार्थ्यांनी संचालनाद्वारे मान्यवरांना मानवंदना दिली. तसेच शालेय विद्यार्थ्यांनी कवायतीचे विविध प्रकार सादर केले. जिल्हा पोलिस दल आणि उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. विनाअपघात सेवा बजावणाऱ्या ट्रक, रिक्षा, एसटी चालकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे, अपर पोलिस अधिक्षक मनीषा दुबुले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांची भाषणे झाली.

स्वागत व प्रास्ताविक सांगली वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक अतुल निकम यांनी करताना वाहतूक सुरक्षा सप्ताहात राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, एसटीच्या सांगली विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर, बाळासाहेब कलशेट्टी, मोटारवाहन निरीक्षक मुरलीधर मगदूम, नवाब मुजावर, प्रशांत जाधव, निरीक्षक अजय सिंदकर, सहायक निरीक्षक काकासाहेब पाटील, मिरज वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक संजय क्षीरसागर उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/