पुण्यातील महिलेला पिस्तूल लावून धमकावले ! RTI कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप विरुद्ध आणखी एक FIR, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – खंडणी व फसवणूकीचे गुन्हे दाखल असलेल्या आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप यांच्यासह साथीदारांविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यवहारात घेतलेले ३२ लाख परत मागू नये, यासाठी एका महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवत धमकावले होते.

आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे, प्रकाश फाले, यश फाले, सविता फाले, पत्रकार देवेंद्र जैन, बडतर्फ पोलीस शैैैलेश जगताप, परवेज जमादार, मयूर हरगुडे,जयेश जगताप, अण्णा दळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कोथरूड परिसरात राहणााऱ्या महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करते. त्यांचे कार्यालय कोथरूड भागात आहे. २०१२ मध्ये प्रकाश फाले याची महिलेबरोबर ओळख झाली होती. त्यावेळी फाले याने जमीन व्यवहारात पैसे गुंतवल्यास परतावा मिळेल, असे आमिष तिला दाखविले होते. त्यानंतर महिलेने विश्वासाने फालेला ३२ लाख रुपये दिले. जमीन व्यवहार न झाल्याने महिलेने फालेकडे पैसे मागितले होते. फसवणूक केल्याप्रकरणी फाले याच्याविरोधात २०१५ मध्ये महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

आरोपी दळवी याने महिलेला पैसे परत मिळवून देतो, अशी बतावणी केली. तिला दळवीने त्याच्या कार्यालयात नेले. त्यावेळी दळवीने महिलेला धमकावले. त्यानंतर महिलेला पुन्हा बडतर्फ पोलीस शैलेश जगताप याच्या कार्यालयात बोलावण्यात आले. तेथे जगताप, त्याचा पुतण्या जयेश जगताप, फाले तसेच अन्य आरोपी उपस्थित होते. तेथे महिलेचा आरोपींबरोबर वाद झाला. तेव्हा आरोपींनी बऱ्हाटेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तो मोठी व्यक्ती आहे. त्यांनी आमदारालाही नमवले आहे, अशी धमकी दिली. शैलेश जगतापने तिला पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हंटले आहे. अधिक तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like