Rupali Chakankar | पडळकरांचं वक्तव्य म्हणजे विकृत मनोवृत्तीचं लक्षण – रूपाली चाकणकर

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Rupali Chakankar | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) ज्येष्ठ आहेत पण श्रेष्ठ नाहीत. मात्र देवेंद्र फडणवीस असे 10- 20 पवार खिशात घालून फिरतात, अशा शब्दात भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी शरद पवारांवर टीका केली होती. गोपीचंद पडळकरांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी पडळकरांवर निशाणा साधला आहे.

 

गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य म्हणजे विकृत मनोवृत्तीचं लक्षण आहे. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन ते टीका करत आहेत, याचा अर्थ हे त्यांच्या मानसिक नैराश्याचं (Mental Depression) प्रतिक आहे. त्यांना किती नैराश्य आलेलं आहे. हे त्यांच्या सततच्या वक्तव्यामधून दिसून येत असल्याचं म्हणत रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी पडळकरांवर टीका केली.

 

दोन वर्षापूर्वी स्थापन झालेलं महाविकास आघाडीचं सरकार उत्तमरित्या काम करत आहे. कोरोना (Corona) काळातही सरकारने राज्याच्या पालकत्त्वाची जबाबदारी (Guardianship) कशी निभवायची हे दाखवून दिलं आहे. त्या काळात सरकोरसोबत जनताही उभी राहिली हे विरोधकांना सहन होत नसल्याचं चाकणकर म्हणाल्या. याआधी राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील (Rupali Thombre Patil) यांनीही पडळकरांवर टीका केली आहे.

 

दरम्यान, गोपीचंद पडळकर यांना सद्बुद्धी देवो यासाठी बिरोबाला साकडं घातलं आहे. पवार नाव ऐकलं तरी पडळकरांना झटके येत असतील कारण त्यांचं दर तीन महिन्याला असं वल्गर वक्तव्य असतं. शेवटी शिक्षणाचा अभाव (Lack Of Education) अशा शब्दात रूपाली पाटील यांनी पडळकरांवर टीका केली.

काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर?-
ज्येष्ठ आहेत पण श्रेष्ठ नाहीत. काही केलं तरी मीच केलं आणि माझ्या पुढे कोणी जाऊ नये, अशी त्यांची भूमिका असते.
मात्र देवेंद्र फडणवीस असे 10- 20 पवार खिशात घालून फिरतात. विश्वासघातकीपणा, गद्दारीपणा, लबाडीपणा, राष्ट्राच्या विरोधात भूमिका जी शरद पवारांकडे आहे.
त्यांच्या पुढचं नेतृत्त्व करण्याची ताकद देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) असल्याचंही पडळकर म्हणाले.
विधीमंडळाच्या पायऱ्यांवरून जाताना भाजपच्या (BJP) नेत्यांनी, उत्तर प्रदेश (Uttar Prasdesh) झांकी है, महाराष्ट्र (Maharashtra) बाकी है, अशा घोषणा दिल्या.

 

 

Web Title :- Rupali Chakankar | NCP leader rupali chakankar responds to bjp leader gopichand padalkars criticism of sharad pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rupali Thombare Patil | शरद पवारांवरील टीकेनंतर रूपाली पाटील यांचा गोपीचंद पडळकरांवर पलटवार; बिरोबाला घातलं ‘हे’ साकडं !

 

Pune Corporation | पुणे महानगरपालिकेत कायद्यानुसार सहावे बजेट (PMC Budget) कोणालाही सादर करता येत नाही – NCP

 

TRA Brand Trust Report | Dell बनला भारताचा सर्वात विश्वसनीय ब्रँड, टॉप 5 मध्ये कोणताही भारतीय ब्रँड नाही