Rupali Chakankar | ‘सरकार बदललं म्हणून काय झालं ? मी महिला आयोगाचं अध्यक्षपद सोडणार नाही’ – रूपाली चाकणकर

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Rupali Chakankar | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मोठ्या भूमिकेनंतर राज्यात सत्तांतर झाले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि राज्यात शिंदे गट – भाजपचं सरकार स्थापन झालं. त्यामुळे आता राजकीय सत्तासमीकरणेही बदलणार आहे. दरम्यान, आघाडी सरकारच्या काळात महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर विराजमान झालेल्या रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी आपल्या पदाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

 

“राज्यात सरकार बदललं असलं तरी मी महिला आयोगाचे अध्यक्षपद सोडणार नाही,” असं रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. “राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद हे घटनात्मक पद आहे. ते स्वीकारण्यापूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेसमधील पद सोडले होते. त्यामुळे राज्यात सत्तापरिवर्तन होऊन नवं सरकार सत्तेवर आलं तरी हे पद सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” असं चाकणकर म्हणाल्या. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केलं आहे.

 

पुढे चाकणकर म्हणाल्या, “राज्यातील महिलांची सुरक्षा, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून महिलांना न्याय देण्याचं काम महिला आयोगाकडून केलं जाईल.”
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला अन् नवं सरकार स्थापन झालं.
यानंतर आता विविध पदावर असलेल्या आघाडी सरकारमधील नेते, पदाधिकारी यांना आपल्या पदावरुन पायउतार व्हावे लागण्याची शक्यता आहे.
तसेच चाकणकर यांनाही महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागेल का ? याबाबत राजकीय चर्चा होत आहेत.

 

Web Title :- Rupali Chakankar | what happened when the government changed i will not leave the post of chairperson of the womens commission said rupali chakankar clearly

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा