विकी कौशलनं अखेरच्या क्षणी सोडला ‘सारे जहां से अच्छा’, मेकर्सनं साधला ‘या’ खानसोबत संपर्क, 300 कोटी फिक्स ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार आमिर खान आणि शाहरुख खाननंतर आता विकी कौशलनंही सारे जहां से अच्छा या बिग बजेट सिनेमातून काढता पाय घेतला आहे. राकेश शर्मा यांचा हा बायोपिक सिनेमा आहे. रॉनी स्क्रूवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूर मिळून हा सिनेमा प्रोड्युस करत आहेत. दीर्घकाळापासून हा सिनेमा अडकला आहे असं दिसत आहे. मेकर्स अजूनही हा सिनेमा फ्लोरवर का आणत नाहीत हेही समजू शकलेलं नाही. काही दिवसांपूर्वी सिनेमासाठी विकी कौशलच्याच्या नावाचा खुलासा झाला होता. सर्वांना वाटलं की, सिनेमाची शुटींग सुरू होत आहे. परंतु असं काही होऊ शकलं नाही.

एका वेबसाईटनं दिलेल्या रिपोर्टनुसार आता विकी कौशलनं सिनेमासाठी नकार दिल्यानंतर मेकर्सनं सलमान खानसोबत संपर्क साधला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रोड्युसर सिद्धार्थ रॉय कपूरनं काही आठवड्यांपूर्वीच सिनेमाच्या संदर्भात सलमान खानसोबत बातचित केली आहे. त्याला वाटत आहे की, सलमान खान ही भूमिका उत्तमरित्या पडद्यावर साकारू शकतो. हा एक बिग बजेट सिनेमा आहे. याची जबाबदारी सलमान खानसारखा मोठा स्टरच उचलू शकतो.

सूत्रांनी पुढे सांगितलं आहे की, सलमान खानकडे मार्चमधील काही डेट्स आहेत. यामध्ये सलमान सारे जहां से अच्छा या सिनेमाची स्टोरी ऐकणार आहे. सलमानला सिनेमाची कॉन्सेप्ट आवडली आहे. परंतु अद्याप मात्र त्यानं ग्रीन सिग्नल दिलेला नाही.