बबीता फोगटच्या ट्विटनं राजस्थानच्या राजकारणात उडवली खळबळ, लिहीलं – ‘पायलट उड्डाण घेण्यासाठी तयार’

जयपूर : पोलीसनामा ऑनलाइन  –  राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी रविवारी रात्री दावा केला की, अशोक गेहलोत सरकार संकटात आहे आणि काँग्रेससह काही अपक्ष आमादारांनी त्यांना पाठींबा देण्याचे अश्वासन दिले आहे. एका अधिकृत वक्तव्यात पायलट यांनी म्हटले की, ते सोमवारी होणार्‍या काँग्रेस आमदार गटाच्या बैठकीत सहभागी होणार नाहीत.

अल्पमतात गेहलोत सरकार

पायलट यांनी म्हटले की, 30 पेक्षा जास्त काँग्रेस आणि काही अपक्ष आमदारांनी समर्थन देण्याचे अश्वासन दिल्याने अशोक गेहलोत सरकार अल्पमतात आहे. शनिवारी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपा सरकाला अस्थिर करत असल्याचा आरोप केला होता, यानंतर निर्माण झालेल्या राजकिय संकटात पायलट यांची ही पहिली प्रतिक्रिया आली आहे.

बबीता फोगटने ट्विटकरून उडवली खळबळ

चॅम्पियन कुस्तीपटू आणि भाजपा नेता बबीता फोगटने सोशल मीडियावर याप्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिने ट्विटमध्ये लिहिले, ‘पायलट उड्डाण घेण्यासाठी तयार आहे.‘

दिल्लीत गेले होते तीन आमदार

असा आरोप करण्यात आला होता की, मध्यप्रदेशप्रमाणे भाजपा येथील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे, तर पक्षाचे आमदार आणि अपक्ष आमदार गेहलोत यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवण्यासाठी त्यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेत आहेत.

पायलट यांचे समर्थक मानले जाणारे काही आमदार शनिवारी दिल्लीत असल्याने गटबाजी होण्याची चर्चा निवळली होती. मात्र, या तीन आमदारांनी जयपूरला आल्यानंतर स्थिती स्पष्ट करताना म्हटले की, दिल्लीत ते आपल्या व्यक्तीगत कामांसाठी गेले होते. दानिश अबरार, चेतन डूडी आणि रोहित बोहरा यांनी म्हटले की, त्यांच्याबाबत मीडियाने शंका व्यक्त केली होती, परंतु ते पक्षाच्या सूचनांचे पालन सच्चा सैनिकाप्रमाणे करतील.

सोमवारच्या बैठकीत पायलट सहभागी होणार नाहीत

रविवारी सायंकाळी उशीरा या आमदारांद्वारे मुख्यमंत्री निवासस्थानी बोलावण्यात आलेल्या प्रेस कॉन्फरन्सनंतर पायलट यांच्याकडून वक्तव्य जारी करण्यात आले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सोमवारी काँग्रेस आमदार गटाची बैठक बोलावली आहे, ज्याबाबत पायलट यांनी म्हटले की, ते या बैठकीत सहभागी होणार नाहीत.