‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकरची फसवणूक ! रिअल इस्टेट व्यावसायिकानं अलिशान घर बांधण्यासाठी विकली तलावाची जमीन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हैदराबादमधील एका रिअल इस्टेट व्यावसायिकाने क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा भारत रत्न सचिन तेंडुलकरलाच चुना लावला आहे. सुधीर रेड्डी नावाच्या एका व्यावसायिकाने आरोप केला की, त्याच्या बहिणीचा नवरा कोटा रेड्डी जो हैदराबादचा खूप मोठा रिअल इस्टेटचा व्यापारी आहे. त्याने मुलगा आदित्यच्या नावाने ‘श्री आदित्य होमस् प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी उघडून अनेक मोठमोठ्या स्टार्सची फसवणूक केली आहे. सुधीर रेड्डीने आरोप केला आहे की, मोठमोठ्या तारकांना मोठे आलिशान घर बांधण्यासाठी चांगली जमीन देण्यासाठी तलावाची दलदलीची जमीन विकली जात आहे, तर तलावाची जमीन सरकारची असते. सुधीर रेड्डीचे म्हणणे आहे की, कोटा रेड्डीने क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणार्‍या सचिन तेंडुलकरची फसवणूक केली आहे.

khotardeसचिनला हे माहिती नाही कि तो क्लिन बोल्ड झाला आहे . कोटा रेड्डीने लेक व्ह्यूसह एक आलिशान घर बांधण्याचे स्वप्न दाखवुन हैदराबादपासून 40 कि.मी. अंतरावर असलेल्या रंगारेड्डी जिल्ह्यातील महेश्वरम मंडळ येथील रवीर्याल तलावाची जमीनच विकली आहे, जी जमीन दलदलीची असते आणि घर बांधण्यास योग्य नसते, सरकारही येथे घर बांधण्याची परवानगी देणार नाही. मात्र, कोटा रेड्डी येथील जमीन ताब्यात घेत असून ती मोठ्या लोकांना विकत आहे. सचिन तेंडुलकरची फसवणूक झाली, पण सचिनला ते माहित नाही. सचिनने सहा एकर जमीन खरेदी केली असून ती सचिनची पत्नी अंजलीच्या नावे नोंदविली गेली आहे.

सुधीर रेड्डी यांचे म्हणणे आहे की, कोटा रेड्डीने सचिनसोबतच बाहुबली चित्रपट अभिनेत्री रम्या कृष्णा आणि दक्षिण आघाडीची अभिनेत्री नयनतारा यांना एक-एक एकर जमीन विकली आहे. दरम्यान, सुधीर रेड्डी ‘श्री आदित्य होम्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीत दिग्दर्शक म्हणून काम करायचा, कोटा रेड्डी ज्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, त्याचवेळी सुधीर रेड्डी यांना कळलं की कोटा रेड्डीने अनेक बिल्डरांना फसवले आहे. सुधीर रेड्डी यांनी कोटा रेड्डीविरूद्ध ज्युबिली हिल्स पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल केला आहे.