Video : शहिद हेमंत करकरेंबद्दल साध्वी प्रज्ञासिंह यांचे संतापजनक वक्तव्य ; म्हणाल्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्या मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथून निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. मालेगाव बॉम्बस्फोटात सहभाग असल्याचे गंभीर आरोप असताना त्यांना उमेदवारी देण्यावरून सध्या विरोध होत आहे. त्याचदरम्यान त्यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल संतापजनक वक्तव्ये केली आहेत.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत. त्यांनी याप्रकरणी ९ वर्षे कारावास भोगला. त्यानंतर एनआय़ए कोर्टाने त्यांची सुटका केली आहे. नुकताच त्यांनी भाजमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांना भाजपने भोपाळमधून कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्याविरोधात उमेदवारी दिली आहे. उमेदवारी घोषित झाल्यापासून आपल्यावर कारागृहात असताना कसा अन्याय करण्यात आला हे सांगण्यास सुरुवात केली आहे.

त्यानंतर आज त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात त्यांनी तत्कालीन एटीएस चीफ व २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधानं केली आहेत.

काय म्हणाल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

मी त्याला सांगितलं होतं तुझा सर्वनाश होईल. ठीक सव्वा महिन्यात सुतक लागतं. ज्या दिवशी मी गेले होते. त्याचं सुतक लागलं होतं. आणि ठिक सव्वा महिन्याने ज्या दिवशी दहशतवाद्यांनी त्याला गोळी मारली त्या दिवशी त्याचा अंत झाला.