साध्वी प्रज्ञा सिंहांचा संरक्षण मंत्रालयाच्या ‘त्या’ समितीमध्ये समावेश, ‘अनाकलनीय’ असल्याचं काँग्रेसनं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भोपाळच्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या समितीमध्ये स्थान देण्यात आले असून एक महत्वाची जबाबदारी देखील देण्यात येणार आहे. याबाबत राजनाथ सिंह हे आग्रही असल्याचे समजते. नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह यावेळी भोपाळ मधून खासदार म्हणून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या आहेत.

संरक्षण कार्य समिती मध्ये एकूण 21 सदस्य आहेत. यामध्ये साध्वी यांचे नाव देखील आहे. या समितीमध्ये चेअरमॅन राजनाथ सिंह यांच्या व्यतिरिक्त फारूक अब्दुल्ला, ए राजा, सुप्रिया सुळे, मीनाक्षी लेखी, राकेश सिंह, शरद पवार, जेपी नड्डा यांचा देखील समावेश आहे.

 

अनेक वक्तव्यामुळे चर्चेत
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर त्यांना लोकसभेची उमेदवारी घोषित झाल्यापासून त्या चर्चेत राहिलेल्या आहेत. नथुराम गोडसेला देशभक्त म्हणण्यापासून ते विरोधकांवर मारक शक्तीचा वापर करणार अशा प्रकारच्या अनेक वक्तव्यांमुळे साध्वी नेहमीच चर्चेत राहिलेल्या होत्या. अनेकदा भाजपकडून त्यांना चेतावणी देखल देण्यात आलेली होती. त्यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी देखील वादास्पद वक्तव्य केले होते.

पंतप्रधान म्हणाले होते मनापासून माफ करू शकणार नाही
ज्यावेळी साध्वी प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसेला देशभक्त अशी उपमा दिली होती त्यावेळी विरोधकांनी जोरदार हंगाम केला होता. त्यावेळी पंतप्रधानांनी यावेळी वक्तव्य करताना मी कधीही मनापासून साध्वी यांना माफ करू शकणार नसल्याचे म्हंटले होते. यावेळी भाजपकडून कारणे दाखवा नोटीस देखील साध्वीला देण्यात आली होती.

2008 मध्ये मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह या आरोपी आहेत आणि सध्या त्या जामिनावर बाहेर आहेत. अजूनही याबाबत न्यायालयात सुनावणी सुरु आहे. भोपाळमध्ये साध्वी यांनी काँग्रेसच्या दिग्विजय सिंह यांचा पराभव केला होता.

Visit : Policenama.com