Sahakar Nagar Pune Crime | पुणे : आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली सुरु होता वेश्या व्यवसाय, गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sahakar Nagar Pune Crime | सहकारनगर परिसरातील एका आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्रामध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा (Prostitution Racket) पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाच्या (SS Cell Pune) पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बालाजी नगर बसस्टॉप जवळ (Balaji Nagar Bus Stop) असलेल्या दिशा आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्र (Disha Ayurvedic Massage Treatment Center) येथे बुधवारी (दि.17) सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) रिना अॅबेल डेनियल (वय-36 रा. राजीव गांधी नगर, कोरेगाव पार्क, पुणे – Koregaon Park) हिच्या विरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाच्या महिला पोलीस हवालदार मनिषा सुरेश पुकाळे यांनी फिर्याद दिली आहे.

सहकारनगर परिसरातील बालाजी नगर बसस्टॉप जवळ असलेल्या बन्सल अपार्टमेंट मध्ये दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं. 22 मध्ये असलेल्या दिशा आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्र येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला समजली. त्यानुसार पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री करुन घेतली.
त्यानंतर मसाज उपचार केंद्र येथे छापा टाकला. आरोपी या ठिकाणी आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली पीडित मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होती.
वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून आरोपी स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात समोर आले.
पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे (PI Uttam Bhajanawale) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shirur Lok Sabha | अमोल कोल्हे यांनी शिरूरसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज, प्रमुख नेत्यांची उपस्थिती, जोरदार शक्तीप्रदर्शन (Video)

Baramati Lok Sahba | सुप्रिया सुळे यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला (Videos)

Ajit Pawar NCP MLA | अजित पवारांच्या आमदाराचे खळबळजनक वक्तव्य, सहा महिन्यानंतर महायुती तुटणार? बारणेंच्या अडचणी देखील वाढू शकतात