बिहारमध्ये बॅन होणार सलमान खान, करण जोहर आणि आलिया भटचे सिनेमे ?

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आता घराणेशाहीचा मुद्दा जोरावर आहे. अनेकजणांचं म्हणणं हे की, बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी इंडस्ट्रीत टिकणं काही लोक मुश्किल करत आहेत. यानंतर अनेक स्टार किड्स लोकांच्या निशाण्यावर आले. अनेकजणांनी तर करण जोहर, सलमान खान यांनाही या प्रकरणासाठी जबाबदार धरलं आहे. इतकंच नाही तर आता बिहारमध्ये त्यांचे सिनेमे बॅन करण्याची मागणी केली जात आहे.

एका इंग्रजी वृत्तानुसार, नेपोटीजमचा मुद्दा सध्या जोरदार चर्चेत आहेत. सुशांतच्या आत्महत्येनंतर आता पाटण्यातील लोक करण जोहर, आलिया भट आणि सलमान खान यांच्या सिनेमांवर राज्यात बंदी घालण्यात यावी अशी मागणी करत आहेत.

अलीकडेच सोशल मीडियावर अनेकांनी करण जोहर आणि सलमान खानला सुशांतच्या आत्महत्येसाठी जबाबदार धरत त्यांना अनफॉलो करण्याची मोहिम राबवली होती. यानंतर त्यांच्या फॉलोवर्समध्ये घट होतान दिसली जी अजूनही सुरूच आहे. बॉलिवूडमधील मुव्ही माफियांविरोधातही अनेकजण आवाज उठवताना दिसत आहेत.

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्याच्या निधानानंतर आता सोशलवर इनसाईडर्स-आउटसईडर्स, नेपोटीजम अशी अनेक मुद्द्यावर चर्चा रंगली आहे आणि वादही होत आहे. काही केल्या चाहत्यांचा राग अजूनही शांत होत नाही असं दिसतंय. सुशांतला न्याय मिळावा म्हणून अनेक चाहते मागणी करत आहेत. चाहत्यांनी अलीकडेच आयपीसीमधील कलम 302 अंतर्गत केस दाखल करण्याची मागणी केली होती.