..म्हणून सलमान खानने अजून लग्न केलेले नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा दबंग सलमान खान त्याचा आगामी सिनेमा भारतमुळे सध्या चांगलाच चर्चेत असल्याचं दिसत आहे. प्रोफेशनल लाईफशिवाय सलमान खान त्याच्या पर्सनल लाईफमुळेही नेहमी चर्चेत असतो. सलमानच्या लग्न न करण्यामागे नेमके काय कारण आहे सर्वांना जाणून घेण्याची भलतीच उत्सुकता आहे. सलमानला अनेकदा मुलाखतींमध्ये लग्न न करण्याबाबत प्रश्न विचारला जातो. नुकताच त्याचा लग्न न करण्याबाबत मोठा खुलासा झाला आहे. त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

समोर आलेल्या वृत्तांनुसार, सलमान खान त्याच्या परिवाराला घेऊन खूपच प्रोटेक्टिव्ह आहे. त्याचं त्याच्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. त्याला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतो. सलमानच्या लग्नाला घेऊन अनेकदा विचार केला गेला आहे परंतु तो आपल्या कुटुंबाव्यतिरीक्त कोणाला जास्त महत्त्व देऊ शकला नाही. सलमानचं असं म्हणणं आहे की, आपल्या लाईफ पार्टनरला वेळ आणि सन्मान न देणं हे चुकीचं आहे. हेच कारण आहे की सलमानने अजूनपर्यंत लग्न केलं नाही.

म्हणून सलमान खान किसिंग सीन आणि न्यडिटीपासून लांबच राहतो

याशिवाय बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या सिनेमांमध्ये त्याचा भर हा अ‍ॅक्शन सीनवर जास्त असतो. तुम्ही पाहिले असेल की, बोल्ड सीन किंवा किसिंग सीन सलमानच्या सिनेमांमध्ये दिसत नाहीत. न्यूडिटीपासूनही तो चार हात लांबच दिसतो. याबाबत अनेकांना प्रश्न पडला होता. आता नुकताच सलमानने या गोष्टीचा खुलासा केला आहे. एका मुलाखतीत बोलताना त्याने यावर भाष्य केले आहे.

एका मुलाखतीत बोलताना सलमान म्हणाला की, “सिनेमांमध्ये जेव्हा किसिंग सीन येतो, तेव्हा कुटुंबीयांसोबत पाहताना खूपच विचित्र वाटतं. नग्नता आणि किसिंग सीन नसलेल्या सिनेमांवरच मी माझं लक्ष केंद्रीत करू इच्छितो. माझ्या बॅनरअंतर्गत निर्मित होणाऱ्या सिनेमांमध्ये अ‍ॅक्शन, रोमान्स, खट्याळपणा असावा असं मला वाटतं. जर माझा सिनेमा ‘A’प्रमाणपत्राचा असेल तर त्यातील अ‍ॅक्शन सीनमुळे असावा. सिनेमांमधील किसिंग सीन आणि न्यडिटीपासून मी लांबच राहतो.” असे सलमान म्हणाला.