लवकरच एकाच सिनेमात दिसू शकतात सलमान, शाहरुख आणि आमिर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आमिर, शाहरुख आणि सलमान हे बॉलिवूड मधील असे खान आहेत ज्यांच्या केवळ नावामुळे सिनेमा चालतात. यांना एकत्र सिनेमात पाहून खूप काळ लोटला आहे. या तिघांनाही एका सिनेमात पाहणे म्हणजे चाहत्यांसाठी स्वप्नं पाहण्यासारखंच आहे. चाहत्यांचं हे स्वप्न लवकरच सत्यात उतरेल असं दिसत आहे. बॉलिवूडच्या रिपोर्टनुसार, नुकतीच या तिघांची भेट झाली आहे असे समोर आले आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, आमिर खान आणि सलमान खान शाहरुख खानच्या मन्नतवर गेले होते. येथेच या तिघांचे बोलणे झाले. असे समजत आहे की ही भेट एका खास प्रोजेक्टमुळे झाली आहे. एक काळ असा होता की, फक्त त्यांच्या नावामुळे सिनेमे खूप चालत असत. परंतु या तिघांसाठी मागील काही काळ काही विशेष नव्हता. गेल्या वर्षात म्हणजेच 2018 मध्ये तिनही खान्सचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉ झाले. रेस 3, झिरो आणि ठग्ज ऑफ हिंदुस्तान हे सिनेमे वर्षातील सर्वात फ्लॉप सिनेमे ठरले आहेत. त्यानंतर आता असा अंदाज लावला जात आहे की, हे तिघेही एका सिनेमात एकत्र दिसू शकतात.

तिनही खान्सच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सलमान खानचा भारत हा सिनेमा ईदच्या मुहुर्तावर प्रदर्शित होत आहे. आमिर खान हॉलिवूड सिनेमा फॉरेस्ट गंप च्या रिमेकवर काम करत आहे. झिरो फ्लॉप झाल्यानंतर मात्र शाहरुख खानने कोणताही नवीन सिनेमा साईन केलेला नाही.