दहा लाखांची खंडणी घेताना संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षाला रंगेहात अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – संभाजी ब्रिगेडचा जिल्हाध्यक्ष सुयोग गजानन औंधकर याला दहा लाख रुपयांची खंडणी घेताना अटक केली. सहकारी संस्थांच्या सहायक निबंधक कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी मागत असताना पोलीसांनी हि कार्यवाही केली आहे. औंधकर याला पोलीसांनी खंडणी घेताना रंगेहात पकडल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

सुयोग गजानन औंधकर हा सांगली जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष आहे. साखर कारखान्याच्या निवडणुकीत तुम्ही उमेदवारी अर्जाची माहिती नोटीस  नोटीस बोर्डवर का लावली नाही. त्या निवडणुकीत तुम्ही तुमच्या पदाचा गैरवापर केला आहे असे म्हणत हि बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे अशी बतावणी केली. संबंधित अधिकाऱ्यांना या इसमांने खंडणीसाठी धमकावले आणि त्यांच्या कडून १० लाखांची खंडणी मागितली. हि खंडणी स्वीकारताना संबंधित संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षाला अटक केली आहे.

इस्लामपूरचे पोलीस उपाधीक्षक कृष्णत पिंगळे यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री संबंधित संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षाला रंगे हात अटक केली आहे. संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षासोबत माहिती अधिकार कार्यकर्ता कृष्णा विश्वनाथ जंगम याचा हि या प्रकरणात हात असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. याप्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सुयोग औंधकर याने सहायक निबंधक आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल डफळे यांना धमकावत १० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. डफळे हे सुयोग औंधकर याला १० लाख रुपयांची खंडणी देणार आहेत अशी माहिती पोलीस उपाधीक्षक कृष्णत पिंगळे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहिती नंतर पोलीसांनी सापळा रचून सुयोग औंधकर याला अटक केली आहे. कृष्णा जंगम या सुयोग औंधकर याच्या साथीदाराला मध्य रात्री पोलीसांनी वाळवा येथून अटक केली आहे.