Sameer Wankhede | मलिकांच्या ‘त्या’ आरोपावरुन वानखेडेंचं प्रत्युत्तर; म्हणाले – ‘वाशीमधील ‘त्या’ बारचे मालक आपणच, ‘मी 2006 पासूनच…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sameer Wankhede | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि मंत्री नवाब मलिकांनी (Nawab Malik) एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप करत आहे. आजही मलिकांनी आरोपाचे सत्र सुरूच ठेवले आहे. तसेच वानखेडे हे मुंबईमधील एका बार आणि रेस्तराँचे मालक असून त्याचा परवाना वानखेडेंच्या नावे असल्याचा दावा मलिकांनी केला आहे. यावरुन समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एका मुलाखती दरम्यान बोलताना मात्र वानखेडे यांनी आपण भारतीय महसूल सेवेमध्ये (IRS) रुजू झाल्यापासून हा परवाना आपल्या नावे असल्याचं स्पष्ट केलंय. या परवान्यासंदर्भातील कायदेशीर हक्क हे समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede) यांच्याकडे देण्यात आलेत. समीर वानखेडे (Sameer Wankhede) म्हणाले, यात बेकायदेशीर असं काहीच नाहीय. मी सेवेमध्ये रुजू झालोय तेव्हापासून म्हणजेच 2006 सालापासून या बार आणि रेस्तराँरंटचा उल्लेख माझ्या वर्षीक स्थावर मालमत्तेमध्ये करत आहे. तसेच या परवान्याबद्दलचाही उल्लेख मी संपत्तीच्या हिशोबात मांडलाय. या उद्योगामधून मिळणाऱ्या कमाईचा सर्व उल्लेख मी प्राप्तीकर परताव्याच्या कागदपत्रांमध्ये केला असल्याचं वानखेडे म्हणाले.

दरम्यान, समीर वानखेडे यांच्या मालकीचा हा बार आणि रेस्तराँ नवी मुंबईमधील वाशी येथे आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या (maharashtra state excise department) अहवालानुसार वाशीमधील (Washi) सद्गुरु हॉटेलचा (Hotel Sadguru) परवाना वानखेडे यांच्या नावे आहेत. हा परवाना 27 ऑक्टोबर 1997 रोजी जारी केला आहे. तसेच हा परवाना रिन्यू करण्यात आला असून सध्या तो 31 मार्च 2022 पर्यंत पात्र आहे. या बारमध्ये परदेशी तसेच भारतीय बनावटीच्या दारुची विक्री करण्यास परवानगी देण्यात आलीय. दरम्यान, मलिकांनी (Nawab Malik) ट्विटच्या माध्यमातून सद्गुरु रेस्ट्रो बारचा फोटो शेअर करत वानखेडेंवर निशाणा साधला आहे. तर, समीर दाऊद वानखेडे यांचे हे फर्जीवाडा केंद्र आहे, अशा कॅप्शनसहीत मलिकांनी फोटो शेअर केला आहे.

Web Title : Sameer Wankhede | NCB officer sameer wankhede owns a bar says nothing illegal about it ncp minister nawab malik

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Farm Laws | शेतकरी आंदोलनाचा मोठा विजय ! वर्षभरापासून सुरू होतं आंदोलन; 600 शेतकर्‍यांचा बळी का घेतला?, विरोधकांचा पीएम मोदींवर हल्ला

Farm Laws | PM नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय ! 3 कृषी कायदे केंद्राकडून रद्द; देशवासियांची माफी मागून 7 वर्षाच्या काळात प्रथमच घेतले पाऊल मागे (व्हिडीओ)

Pune Crime | काय सांगता ! होय, चक्क पुणे महापालिकेला 1 कोटी रुपयांचा गंडा घालण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

Balasaheb Thorat | ‘पोटनिवडणूक बिनविरोध करावी याबाबत फडणवीसांसोबत चर्चा’ – थोरात

Maharashtra Gram Panchayat by-election | महाराष्ट्रातील 7 हजार ग्रामपंचायत सदस्यांच्या पोटनिवडणुकांसाठी तारखा जारी

Kanyaka Bank Chandrapur Recruitment 2021 | श्री कन्यका नागरी सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती, जाणून घ्या

NCP MLA Babajani Durrani | राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी; प्रचंड खळबळ