Maharashtra Gram Panchayat by-election | महाराष्ट्रातील 7 हजार ग्रामपंचायत सदस्यांच्या पोटनिवडणुकांसाठी तारखा जारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Gram Panchayat by-election | महाराष्ट्रातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या 7 हजार 130 ग्रामपंचायत सदस्यांच्या जागांसाठी पोटनिवडणुकीची (Maharashtra Gram Panchayat by-election) तारीख जारी झाली आहे. याबाबत माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान (U.P. S. Madan) यांनी जारी केली आहे. 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त मदान यांनी दिली आहे.

 

निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे, असंदेखील राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान (U.P. S. Madan) यांनी स्पष्ट केलं आहे.

 

सविस्तर माहिती –

– 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 – नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील.

– 7 डिसेंबर 2021 – छाननी

– 9 डिसेंबर 2021 – नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत (दुपारी 3 पर्यंत)

– 21 डिसेंबर 2021 – मतदान

– 22 डिसेंबर 2021 – मतमोजणी

 

मतदानाची वेळ – सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30

गडचिरोली जिल्ह्यासाठी – सकाळी 7.30 ते दुपारी 3.00

 

Web Title :- Maharashtra Gram Panchayat by-election | election commission announced date for maharashtra grampanchayat by elections

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा