अभिनेत्री समीक्षा सिंहनं ‘या’ सिंगरसोबत थाटला विवाह अन् इंडस्ट्रीला केलं Good Bye ! पहिल्या पतीपासून 10 वर्षांचा मुलगा

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री समीक्षा सिंह हिनं लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. बॉलिवूड आणि पंजाबी सिनेमा तसेच टीव्ही शोमध्ये काम केलेल्या समीक्षानं 3 जुलै 2020 रोजी लग्न केलं आहे. समीक्षानं सिंगापूरचा इंडस्ट्रियलिस्ट आणि सिंगर शैल ओसवाल सोबत लग्न केलं आहे. 3 जुलै रोजी शैलच्या वडिलांची बर्थ अॅनिव्हर्सरी होती. 2016 साली त्यांचं निधन झालं होतं. समीक्षा आणि शैल यांनी सिंगापूरमधील एक गुरुद्वारात जाऊन साध्या पद्धतीनं लग्न केलं आहे. समीक्षा आणि शैल यांची फॅमिली व्हर्चुअली या सोहळ्याच्या हिस्सा बनली आहे.

समीक्षा सिंहचे फोटो पाहून प्रेमात पडला शैल

समीक्षा सिंह आणि शैल ओसवाल यांची पहिली भेट सप्टेंबर 2019 मध्ये झाली होती. मखमली प्यार या सिंग साँगच्या शुटींगदरम्यान दोघांची भेट झाली होती. समीक्षा म्हणाली, “त्यानं माझे फोटो पाहून मला साँगसाठी अप्रोच केलं होतं. तो म्हणाला होता की, फोटो पाहताना अचानक मी तुझ्या प्रेमात पडलो. मला त्याच्यासाठी काहीही फीलिंग नव्हती. शुटींगदरम्यान आमची छान मैत्री झाली. आमच्यात जवळीक वाढली. तो माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद आहे. मी फेब्रुवारी 2020 मध्ये तेरे नाल गाण्याच्या शुटींगसाठी सिंगापूरला आले होते आणि त्याचीच झाले. माझा आता मुंबईला परतण्याचा कोणताही प्लॅन नाही. मी इंडस्ट्रीला आता गुडबाय केलं आहे. मी आता स्क्रिप्टींग, डायरेक्शन आणि प्रॉडक्शनमध्ये काम करणार आहे. आता मी माझं प्रॉडक्शन हाऊस सांभाळणार आहे ज्याची सुरुवात माझ्या सासऱ्यांनी केली होती.

पहिल्या पतीपासून समीक्षा सिंहला 10 वर्षांचा मुलगा आहे

समीक्षा सिंह आणि शैल ओसवाल दोघांचंही हे दुसरं लग्न आहे. याबद्दल बोलताना समीक्षा म्हणते, “पहिलं लग्न अयशस्वी झाल्यानंतर आम्हाला दोघांनाही असं वाटलं होतं की, आम्ही परत कधी लग्न करणार नाही. शैलला पहिल्या लग्नापासून 2 मुलं आहेत. सोहना (17) आणि शिवम (16) अशी त्यांची नावं आहेत. माझं लग्न 2004 साली झालं होतं आणि 2018 मध्ये माझा घटस्फोट झाला होता. मला 10 वर्षांचा मुलगा अमेयबीर आहे. माझा एक्स हसबंड माझा चांगला मित्र आहे. माझा मुलगा आणि एक्स हसंबड दोघंही माझ्या निर्णयानं खुश आहेत.

समीक्षाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं प्रणाम, मारूती मेरा दोस्त, मिस्टर हॉट मिस्टर कूल अशा अनेक हिंदी सिनेमात काम केलं आहे. याशिवाय तिनं जारा, पोरस, तंत्र, खिचडी, बडी दूर से आये, यहा मै घर घर खेल, झारा अशा अनेक मालिकेत काम केलं आहे. समीक्षानं बॉलिवूडसोबतच पंजाबी सिनेमातही काम केलं आहे.