खुशखबर ! सॅमसंग गॅलेक्सी A50s फोन झाला 2500 रूपयांनी ‘स्वस्त’

पोलीसनामा ऑनलाइन  : सध्या मोबाईल वापरणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे , त्यांना नवीन नवीन फीचर्स असलेले मोबाईल फोन वापरायला भरपूर आवडतात , त्यामुळे मोबाईल कंपन्या नवनवीन उत्पादन तयार करत असतात,  सध्याच्या जगातली मोबाईल युजर्स ची संख्या बघता कोरियातील सॅमसंग कंपनीने त्यांचे प्रॉडक्ट सॅमसंग गॅलेक्सी A50s या फोनची खरेदी किंमत कमी केली आहे. सॅमसंग च्या ग्राहकांना आता मोबाईल खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत. महेश टेलीकॉमच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली.

खरेदी किंमत कमी झाल्यामुळे १९ हजार ९९९ किमतीचा ४ जीबी चा मोबाईल आता ग्राहकांना १७ हजार ४९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे. आणि २१ हजार ९९९ रुपयांचा ६ जीबी चा फोन ग्राहकांना १९ हजार ९९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे. ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ऑनलाईन साईट्सवरती या फोनच्या किमतींविषयी माहिती दिलेली आहे. सॅमसंग गॅलेक्सी A50s मध्ये ६.४ इंचाचा एफएचडी प्लस सुपर अमोलेड इनफिनिटी यू डिस्प्ले दिला असून . याचे रिझॉल्युशन १०८०*२३४० असे आहे. त्याबरोबरच इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. तसेच फोनमध्ये एक्सिनॉस ९६१० चिपसेट प्रोसेसर आहे. ४ जीबी रॅम सह १२८ जीबी इंटरनल स्टोरेज दिला आहे.

या मोबाईल ला मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा असून ४८ मेगापिक्सल चा प्रायमरी तसेच ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल तर ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिलेला आहे. ४००० एमएच एवढी बॅटरीची क्षमता असून त्याला कनेक्टिव्हिटीसाठी जीपीएस , वायफाय , युएसबी पोर्ट सी ही सुविधा देण्यात आलेली आहे.