Sandeep Deshpande | ‘स्क्रीप्ट ठरली, कुठे आणून ठेवली बाळासाहेबांची शिवसेना ?’, मनसेची शिवसेनेवर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सुरु असलेल्या सत्तानाट्याचा निकाल आज संध्याकाळी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) लागणार आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting) बोलावली आहे. या बैठकीत औरंगाबादचं (Aurangabad) नामकरण संभाजीनगर (Sambhajinagar) करण्याचा प्रस्ताव ठेवला जाण्याची शक्यता आहे. कालच संसदीय कामकाज मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी हा प्रस्ताव ठेवल्याचे सांगितले होते. या प्रस्तावावरुन मनसे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी शिवसेनेवर (Shivsena) निशाणा साधला आहे. ‘स्क्रीप्ट ठरली, कुठे आणून ठेवली बाळासाहेबांची शिवसेना ?’, अशी टीका संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केली आहे.

 

औरंगाबादचं संभाजीनगर करण्याच्या अनिल परब यांच्या प्रस्तावावरून मनसेने शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
‘राजीनाम्याची’ स्क्रिप्ट ठरली.
संभाजीनगरच्या नामांतराचा आव आणायचा आणि आपले ‘हिरवे प्रेम हेच खरे हिंदुत्व हे सिद्ध करायचे…’ कुठे आणून ठेवलीय मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची शिवसेना ? असं ट्विट संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केलं आहे.

राज्यात सत्ता संकट असताना औरंगाबादचं संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला महाविकास आघाडीतले (Mahavikas Aghadi) घटकपक्ष असलेले काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (NCP) काय भूमिका घेणार, याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.
काँग्रसने याआधी अनेकवेळा औरंगाबादच्या नामांतराला विरोध केला होता.

 

मंगळवारी रात्री भाजप (BJP) नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari)
यांची भेट घेतल्यानंतर आता राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे.
राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे.
मात्र, राज्यपालांच्या या आदेशाविरोधात सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
याप्रकरणी सायंकाळी पाच वाजता यावर सुनावणी होणार आहे.

 

Web Title :- Sandeep Deshpande | mns targets shivsena after proposal to change name of aurangabad to sambhaji nagar maharashtra political crisis

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा