सावधान ! कोल्हापूर सांगलीसह पुण्यात दोन दिवस ‘रेड अलर्ट’, अतिवृष्टीचा इशारा

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – कोल्हापूर, सातारा, सांगलीसह पुण्यात देखील मोठ्या प्रमाणात पावसाने धुमाकूळ घातल्याने मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले होते. त्याचबरोबर सांगलीत पावसाचा जोर अजूनही वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या भागात रेड अलर्ट जरी करण्यात आला असून येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात स्थलांतरित करण्यात आले असून सावध राहण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

पुढील ४८ तासात या ठिकाणी जोरदार पाऊस होणार असून रेड अलर्ट जरी करण्यात आले आहे. त्याचबरोबर कोल्हापूर आणि पुण्यात देखील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सांगली आणि कोल्हापूरच्या काही भागांत अजूनही बचावकार्य सुरु असून नागरीकांचा संसार उघड्यावर पडला असून अनेकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे.

मुंबईत पाऊस नाही

पश्चिम महाराष्ट्र्रात मोठ्या प्रमाणात पावसाने धुमाकूळ घातलेला असताना मुंबईकडे मात्र पावसाने पाठ फिरवली असून मागील काही दिवसांत पावसाचा जोर ओसरला आहे. त्याचबरोबर आणखी पाऊस वाढणार असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत देखील पावसाचा जोर वाढणार असून कमी झालेल्या पट्ट्याचा परिणाम या भागांना देखील मोठ्या प्रमाणात बसणार आहे.

नंदुरबार आणि नाशिकमध्ये देखील मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, जळगाव, जालना, परभणी, आणि हिंगोलीमध्ये थोड्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या या हानीवर केंद्र सरकार देखील लक्ष ठेवून असून राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितली. त्याचबरोबर आणखी काही मदत लागल्यास देखील करण्यात येणार आहे.

पश्चिम महाराष्ट्राबरोबर जळगाव जिल्ह्यात देखील मोठा पूर आला असून जिल्ह्यातील सर्व नद्यांना मोठा पूर आला आहे. सोलापूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले असून पंढरपूरमधील भजनदास चौक, घोगंडे गल्ली, सरकारी दवाखाना, गोविंदपुरा, आंबेडकर नगर या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून दिवस काढावे लागत आहेत.

दरम्यान, या सगळ्या परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांनी या पुराची हवाई पाहणी केली असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात नागरिकांना मदत करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like