सांगली : किल्ले मच्छिंद्रगड येथे व्यायामासाठी गेलेल्या तिघांना ट्रकने चिरडलं

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – कराड-तासगाव रस्त्यावर किल्ले मच्छिंद्रगड येथे व्यायामासाठी गेलेल्या तिघांना ट्रकाने चिरडले. सोमवारी सकाळी ६ च्या सुमारास ही घटना घडली. दीपक गायकवाड, विशाल गायकवाड व प्रविण गायकवाड अशी अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत. घटनेनंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पलायन केले आहे. याबत इस्लामपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
शेणोली येथील दीपक, विशाल, प्रविण गायकवाड हे तिघेजण कराड-तासगाव रस्त्यावर किल्ले मच्छिंद्रगड फाट्याच्या पुलापर्यंत रोज व्यायामासाठी जात होते. पुलाच्या जवळ असणार्‍या पोल्ट्रीच्या रस्त्याकडेला बसून ते व्यायाम करत असत. सोमवारी सकाळी ५ च्या सुमारास या तिघांसह रोहित गायकवाड हे चौघेजण व्यायामासाठी किल्ले मच्छिंद्रगड गावच्या हद्दीत निघाले होते.

मदन मोहिते यांच्या पोल्ट्रीच्या नजीक तिघे व्यायाम करत होते. तर रोहित गायकवाड हे उभा होते. सकाळी ६ च्या सुमारास कराडहुन तासगावच्या दिशेने जाणार्‍या भरधाव ट्रक रस्त्याच्या उत्तर बाजूला न जाता चुकीच्या बाजुने अचानकपणे आला. ट्रक व्यायाम करणार्‍या युवकांच्या दिशेने येत असल्याचे पाहुन रोहित गायकवाड बाजूला झाला. परंतू रस्त्यावर व्यायामासाठी बसलेल्या दीपक गायकवाड, विशाल गायकवाड, प्रविण गायकवाड यांना उठता आले नाही. ट्रक तिघांच्या अंगावरून गेला. अपघातानंतर ट्रक न थांबता तासगावच्या दिशेने निघून गेला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी यांनी प्रविण गायकवाड यांना कराड येथे उपचारास पाठवून दिले. प्रविण गायकवाड याच्यावर कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like