अवधूत लॉ फाउंडेशन तर्फे नोंदणी कार्यालयामध्ये सॅनिटायजर भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना या साथीच्या रोगावरती नियंत्रण मिळवण्यासाठी आज अवधूत लॉ फाउंडेशन तर्फे दुय्यम निबंधक हवेली नं 10, 11, 23 येथे सॅनिटायजर भेट देण्यात आले. तसेच नोंदणी महानिरीक्षक नोंदणी विभाग यांचेकडे कोरोनाच्या धर्तीवर दस्तांची संख्या नियंत्रण करण्याची मागणी पत्राअन्वये करण्यात आली.

सध्या मार्च अखेर असल्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जास्त गर्दी पाहण्यास मिळत आहे. पुणे शहरामध्ये एकूण 28 निबंधक कार्यालय असून दिड ते दोन हजार लोक रोज भेट असतात. प्रत्येक निबंधक कार्यालयामध्ये रोज 80 ते 100 दस्तांची नोंदणी होत आहे. या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचेही आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी अवधूत लॉ फौंडेशन चे अध्यक्ष अड चंदन फरताळे, मार्गदर्शक अ‍ॅड श्रीकांत जोशी, अ‍ॅड संजय कर्डीले, अ‍ॅड कैलास थोरात, अ‍ॅड मनीष डेंगळे, अ‍ॅड नितीन ओंबळे आदी उपस्थित होते.