लग्नाची 12 वर्षे : ‘मान्यता-संजय’ दत्तनं एकमेकांना दिल्या ‘स्पेशल’ शुभेच्छा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता दत्त आज आपल्या लग्नाचा 12 वा वाढदिवस साजरा करत आहेत. मान्यता आणि संजय दत्त दोघांनीही आपल्या स्पेशल अंदाजात एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मान्यतानं संजयला ‘असं’ केलं विश

Advt.

मान्यता दत्त म्हणते, “जगात ही फीलिंग व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. तुम्हाला माहिती आहे की, जीवनात प्रत्येक स्थितीचा सामना करण्यासाठी कोणी तुमच्यासोबत उभं असतं. थँक यु संजय दत्त अनेक वर्षांपासून आणि येणाऱ्या काळात माझ्या आयुष्यात तो व्यक्ती होण्यासाठी.”

संजयनं मान्यताला ‘असं’ केलं विश

संजयनं पोस्ट शेअर करत म्हटलं की, “माहिती नाही तू नसतीस तर मी काय केलं असतं. हॅप्पी अॅनिवर्सरी मान्यता.”

संजय आणि मान्यता यांनी 2008 मध्ये लग्न केलं होतं. 7 फेब्रुवारी रोजी स्पेशल मॅरेज अ‍ॅक्टनुसार गोव्यात दोघांचं लग्न झालं होतं. 11 फेब्रुवारी रोजी पुन्हा त्यांनी हिंदू पद्धतीनं लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहेत. इकरा आणि शाहरान अशी त्यांची नावे आहेत. दोघांच्या लग्नाला 12 वर्षे झाली आहेत.

मान्यता संजयची तिसरी पत्नी

मान्यता दत्त संजयची तिसरी पत्नी आहे. संजयनं 1987 साली ऋचा शर्मा सोबत लग्न केलं होतं. दोघांना त्रिशाला नावाची एक मुलगी आहे. यानंतर संजयनं रिया पिल्लईसोबत 1988 मध्ये लग्न केलं. 2005 साली दोघं वेगळे झाले. 2008 साली संजयनं मान्यतासोबत लग्न केलं.