अभिनेता संजय दत्तला मिळाला US व्हिसा, उपचारासाठी लवकरच होणार रवाना

पोलिसनामा ऑनलाईन – अभिनेता संजय दत्तला अमेरिकेचा व्हिसा मिळाला असून तो लवकरच उपचारासाठी रवाना होणार आहे. त्याला फुफ्फुसाच्या कॅन्सरचे निदान झाले असून उपचारासाठी तो अमेरिका किंवा सिंगापूरला जाण्याची शक्यता आहे.

उपचारासाठी संजूबाबा लवकरच न्यूयॉर्कला रवाना होणार असून तेथील मेमोरिअल स्लोअन केटरिंग कॅन्सर सेंटरमध्ये त्याच्यावर उपचार होणार आहेत. याच ठिकाणी संजय दत्तची आई नर्गिस दत्त यांच्यावर 1980 ते 1981 दरम्यान कॅन्सरवर उपचार सुरू होते. वैद्यकीय बाबींच्या आधारवर व्हिसा मिळवण्यासाठी एका मित्राने संजूबाबाला मदत केली आहे. मान्यता आणि प्रिया यांच्यासोबत तो न्यूयॉर्कला जाणार आहे. संजय दत्तची मुलगी त्रिशला न्यूयॉर्कमध्येच राहत असून उपचारादरम्यान मान्यता आणि प्रियासुद्धा तिथेच राहणार आहेत. युएसचा व्हिसा मिळाला नसता तर संजय दत्तने सिंगापूरला जाण्याची तयारी केली असती. मात्र अमेरिकेचा व्हिसा मिळाल्याने आता तो लवकरच उपचारासाठी तेथे जाण्याची तयारी करणार आहे.