विराट कोहलीची ‘कप्तानी’ इम्रान खान यांची आठवण करून देते, संजय मांजरेकरांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांचे म्हणणे आहे की, भारतीय कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान यांच्यामध्ये अनेक बाबतीत साम्य आहे. मांजरेकर यांनी म्हटले की, इम्रानच्या नेतृत्वात पाकिस्तानची टीम भलेही नेहमी पराभवाच्या छायेत असायची, परंतु ते मॅच जिंकण्याचे नवीन मार्ग शोधत असत.

भारतीय क्रिकेट टीमने रविवारी बे ओव्हल मैदानावर खेळलेल्या पाचव्या आणि अंतिम टी-20 मॅचमध्ये न्यूझीलंडला सात धावांनी पराभूत करून पाच मॅचच्या टी-20 सीरीजमध्ये 5-0 ने क्लीन स्वीप केले. मांजरेकर म्हणाले, न्यूझीलंडमध्ये विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमने केलेल्या कामगिरीने मला इम्रान खानच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या पाकिस्तानच्या टीमची आठवण झाली. दोघेही आपल्या टीममध्ये भरपूर आत्म-विश्वास निर्माण करतात. इम्रान खानच्या नेतृत्वाखाली भलेही पाकिस्तानी टीम पराभवाच्या छायेत असायची, परंतु मॅच जिंकण्यासाठी ते नवनवीन मार्ग शोधत असत.

सध्या कमेंट्री करत असलेले मांजरेकर यांनी विकेटकीपर गोलंदाज लोकेश राहुलचे सुद्धा कौतूक केले. राहुलने रविवारी येथील बे ओवल मैदानात न्यूझीलंड सोबत संपलेल्या पाच मॅचच्या टी-20 सीरीजमध्ये 56, नाबाद 57, 27, 39 आणि 45 धावा केल्या. यासाठी त्याला मॅन ऑफ द सीरीजचा पुरस्कार मिळाला.

न्यूझीलंडचा 5-0 ने सापडासूफ करण्यात आला. टी-20 इन्टरनॅशनलच्या इतिहासात टीम इंडियाने विक्रम केला आणि द्विपक्षीय टी-20 सीरीजमध्ये 5-0 ने जिंकणारी पाहिली टीम म्हणून आपली नोंद केली. आता दोन्ही टीममध्ये तीन मॅचची वनडे सीरीज खेळली जाणार आहे, जिची सुरूवात बुधवारी 5 फेबु्रवारीला होईल.