‘गृहमंत्री’ पदावरून संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले…

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – जागावाटप पूर्ण झाले असल्याचे सांगत शिवसेना उपनेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्रिपद कोणाकडेही गेले तरी त्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडेच असतील, कारण मुख्यमंत्री हे सर्वच खात्यांचे प्रमुख असतात, अशा शब्दात गृहमंत्रिपदाच्या तिढ्यावर स्पष्टीकरण दिले. संजय राऊत जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

खातेवाटपाचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असून, त्यांनी इतर दोन पक्षांच्या प्रमुखांशी चर्चा केली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा तिढा नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून यात कोणताही बदल होणार नसल्याचे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले आहे. गृहमंत्रिपद राष्ट्रवादीकडे जाणार असल्याने शिवसेना कार्यकर्ते नाराज असल्याच्या प्रश्नावर त्यांनी हे पद कोणाकडेही गेले तरी त्याचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडेच असतात, असे सांगितले.

यावेळी उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ यांनी बांधलेल्या महाराष्ट्र सदनाचे कौतुक केले. तसेच हे सरकार पाच वर्षे टिकणार असल्याचे ठामपणे सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/