संजय राऊतांकडून राज्यपालांना ‘निमंत्रण’ ? ‘आम्ही 162’

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तास्थापनेवरुन मोठा पेच निर्माण झाला आहे. भाजपकडून राज्यात सत्तास्थापन करण्यात आल्यानंतर आता महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्याबरोबर राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस या तिन्ही पक्षांकडून सुरुवात झाली ती आपले आमदार हलवण्यास. परंतू आता संजय राऊत यांच्याकडून ट्विट करत दावा करण्यात आला आहे की आमच्याकडे सत्तास्थापनेसाठी 162 आमदारांचा पाठिंबा आहे.

राज्यात भाजपकडून ऑपरेशन कमळ सक्रिय करण्यात आले आहेत. त्यामुळे आमदार फोडाफोडीचे प्रयत्न करण्यात येत आहे. याच कारणाने राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेकडून आपले आमदार सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे.

यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट केले आहे की आम्ही एक आहोत आणि एकत्र आहोत. 162 आमदारांना पहिल्यांदाच एकत्र पाहण्यासाठी ग्रँड हयात हॉटेलला संध्याकाळी 7 वाजता नक्की या आणि तुमच्याच डोळ्याने पाहा. विशेष म्हणजे हे ट्विट राज्याचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना टॅग करण्यात आले आहे.

भाजपला सत्तास्थापनेसाठी जास्त कालावधी देण्यात येतो आणि आम्हाला अत्यल्प कालावधी देण्यात येतो असे म्हणत संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली होती. त्यानंतर आमच्याकडे खरोखर बहुमत आहे. ते पाहायचे असेल तर हयात हॉटेलला या असे लिहित राज्यापालांना हे ट्विट टॅग करण्यात आले आहे.
याआधी संजय राऊतांकडून 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात आले होते. अजित पवार यांनी राष्ट्रवादीशी फारकत घेतल्यानंतर संजय राऊतांकडून आज सकाळी 165 चा आकडा सांगण्यात आला होता. तर आता 162 आमदारांचा आकडा संजय राऊतांकडून सांगण्यात येत आहे.

Visit : Policenama.com