Sanjay Raut | इन्कम आणि टॅक्स फक्त महाराष्ट्रातच, बाकी राज्यात आलबेल; संजय राऊतांची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई (Mumbai) आणि महाराष्ट्र (Maharashtra) सर्वाधिक टॅक्स (Tax) केंद्र सरकारला (Central Government) देते. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांना (Central Investigation Agency) फक्त महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये इन्कम (Income) आहे असे वाटतंय. ज्या ठिकाणी भाजपची (BJP) सत्ता आहे, त्या राज्यात इन्कम नाही आणि टॅक्सही नाही. त्यामुळे त्या राज्यांमध्ये सर्व काही अलबेल चाललंय, असे शिवसेना (Shivsena) नेते खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. तसेच महाराष्ट्राच्या जनतेला कोण कशा प्रकारे त्रास देत आहे याची नोंद जनता घेत आहे, अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली.

 

मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष (BMC Standing Committee Chairman) यशवंत जाधव (Yashwant Jadhav) आणि शिवसेना उपनेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. यावरुन त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

 

केंद्रीय तपास यंत्रणांना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्यावेळी (West Bengal Assembly Election) पश्चिम बंगालमध्ये काम होते. आता मुंबई महापालिका निवडणूक (Mumbai Municipal Election) जवळ येत आहे. त्यामुळे त्यांचे काम महाराष्ट्रातच चालू आहे. बाकी संपूर्ण देश ओस पडला असल्याचे राऊत म्हणाले.

 

भाजपवर निशाणा साधताना राऊत म्हणाले, भाजप जे काही करत आहे याची आम्ही नोंद ठेवत आहोत.
महाराष्ट्राची जनताही पाहात आहे. काय शोध घेयचा असेल तो घ्या. जे शोधायचं आहे ते शोधा.
ढुंढते रह जाओगे. मात्र, परत सांगतो, महाराष्ट्र वाकणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला.

 

Web Title :- Sanjay Raut | income and tax only in maharashtra the rest of the state albel sanjay raut

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा