… तर मी कंगनाची माफी मागण्याचा विचार करेल

पोलीसनामा ऑनलाईन टीम : अभिनेत्री कंगणा रणौतला हरामखोर मुलगी म्हटल्याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका सुरु झाली आहे. या टिप्पणीवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. संजय राऊत यांनी कंगनाची माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. त्यावर जर कंगनाने महाराष्ट्राची माफी मागितली तर मी तिची माफी मागण्याचा विचार करेन, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. तिच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर संजय राऊत आणि कंगना रणौत यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. त्यानुसार राउत यांनी कंगणाला हरामखोर मुलगी शब्द वापरला होता.

त्यामुळे आता सोशल मीडियावर खासदर संजय राउत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला जात आहे. त्यामुळे याबाबत जर कंगणाने आधी राज्याची माफी मागितली तर मी सुदधा विचार करेन असे राउत यांनी सांगितले आहे.