Sanjay Raut On Devendra Fadnavis | संजय राऊतांचा पलटवार, म्हणाले – ‘फडणवीस खोटं बोलतायंत, मंत्रिमंडळातील लोकच ललित पाटीलला…’

मुंबई : Sanjay Raut On Devendra Fadnavis | ललित पाटील (Drug Mafia Lalit Patil) साधा शिवसेनेचा उपशाखाप्रमुख किंवा गटप्रमुखही नव्हता. जे लोक फडणवीसांच्या मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसले आहेत तेच लोक त्याला पोसत होते. गृहमंत्री फडणवीस किती खोटं बोलत आहेत, असा घणाघती आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. (Sanjay Raut On Devendra Fadnavis)

ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपी ललित पाटील यास २०२० मध्ये जेव्हा अटक झाली तेव्हा तो शिवसेनेचा (Shivasena) नाशिक शहरप्रमुख होता, असा आरोप उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यांच्या या आरोपाला राऊतांनी प्रत्युत्तर दिले. (Sanjay Raut On Devendra Fadnavis)

संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस खोटे बोला, पण रेटून बोला याला जागून वागत आहेत. कालच पाहिले की, कुणी तरी एक ड्रग्ज माफिया मुंबईत पकडला आणि चेन्नईत, बंगळुरूत पकडल्याचे सांगत आहेत. हे म्हणतात की, तो शिवसेनेचा नाशिक शहर प्रमुख होता. आम्ही कोण कोण कधी कधी शहर प्रमुख होते त्याची यादी दिली आहे.

राऊत म्हणाले, एकतर फडणवीसांचे त्यांच्या गृहखात्यावर नियंत्रण नाही किंवा त्यांचा गुप्तचर विभाग त्यांना
चुकीची माहिती देत आहे. इतका अपयशी गृहमंत्री महाराष्ट्राने पाहिला नव्हता.

संजय राऊत पुढे म्हणाले की, आता पोलिसांनी निष्पक्षपणे तपास करावा. सध्या मंत्रिमंडळातील जे सर्व पोपट बोलत आहेत ते घाबरून बोलत आहेत. यांना घाम फुटला आहे. म्हणून ते आरोप करत सुटले आहेत.

भाजपावर आरोप करताना राऊत म्हणाले, नाशिकसह अनेक जिल्ह्यातील गुन्हेगारी कोण पोसतंय,
ड्रग्ज माफियापासून खुनी, चोर, दरोडेखोरांना कोण पोसतंय? ज्यांच्यावर ईडी, सीबीआयचे खटले होते
असेच लोक भाजपाबरोबर (BJP) गेले. त्यांच्याबरोबर भाजपाने सरकार बनवले. त्यामुळे भाजपाच गुंडांचा पोशिंदा आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसमधील (Congress) ज्या नेत्यांना ईडी,
पोलीस अटक करायला निघाले होते ते सगळे भाजपाबरोबर गेले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | दुप्पट परताव्याच्या आमिषाने 5 कोटींची फसवणूक, गुन्हे शाखेकडून तिघांना अटक