Sanjay Raut | संजय राऊतांचा भाजपला रोखठोक इशारा, ‘उखाडना है तो उखाड लो’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भ्रष्टाचाराची प्रकरणे (corruption) आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या (Central Investigation Agency) कारवाया यावरुन भाजप (BJP) आणि शिवसेनेचे (Shivsena) नेते आमने-समाने येत आहेत. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या विरोधात शिवसेना खासदार (Shivsena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोमय्या यांना लक्ष्य केले आहे. यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासह भाजपचे अनेक नेते सोमय्या यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. यावरुन आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चंद्रकांत पाटील यांना आणि भाजपच्या नेत्यांना थेट इशारा दिला आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, काही लोक किरीट सोमय्यांच्या बाजूने बोलत आहेत. परंतु त्यांना मी सांगतो की, या प्रकरणामध्ये पडू नका. तुम्ही उघडे पडाल. चंद्रकांत पाटील वगैरे मंडळी ‘बेगानी शादीमें…’ पद्धतीने नाचत आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो की, या प्रकरणात पडू नका, दादा उघडे व्हाल. त्यांचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ. सोमय्यांची लोक धिंड काढणार आहेत. त्यात तुम्ही सामील झाला तर लोक तुमचेही कपडे काढतील, असा रोखठोक इशारा राऊत यांनी दिला आहे.

यावेळी संजय राऊत यांनी सोमय्या यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप (Serious Allegation) केला.
किरीट सोमय्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत आतापर्यंत 211 प्रकरणं माझ्याकडे आली आहेत.
आता दररोज एक भ्रष्टाचाराचं प्रकरण समोर आणणार आहे.
किरीट सोमय्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावाने शेकडो कोटी रुपये उकळले.
याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या (Union Home Minister Amit Shah) नावावर धमक्या (Threat) देऊनही पैसे उकळले आहेत.
हे रेकॉर्डवर आहे. काय करायचे ते करा.
उखाडना है तो उखाड लो, असा इशारा राऊत यांनी दिला.

Web Title :- Sanjay Raut | sanjay raut warns chandrakant patil not to fall in kirit somaiyas case otherwise
Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes ची 4 सर्वात मोठी कारणे, ‘या’ वाईट सवयी आजच सोडा, जाणून घ्या कोणत्या

 

Best Foods For Sound Sleep | रात्री शांतपणे झोपायचे असेल तर,
बिछान्यात जाण्यापूर्वी आवश्य खा ‘या’ 5 वस्तू

 

Weight Loss Kadha | वजन कंट्रोल करण्यासाठी परिणामकारक आहे ‘हा’ एक काढा